मुंबई - कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्याशी संबंधित मुंबईतील जवळपास 29 ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA Raids in Mumbai) छापे टाकले आहेत. यामध्ये दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. (NIA Raids in Mumbai) सलिम फ्रूट असे ताब्यात घेतलेल्या एका व्यक्तीचे नाव आहे. (NIA raids locations linked to Dawood Ibrahim) दरम्यान, माहिममध्येही चार ठिकाणी छापा टाकला आहे.
एनआयएकडून सातत्याने दाऊदशी संबंधित मालमत्तांवर कारवाई - सूत्रांच्या माहितीनुसार, दाऊद गँग मुंबईत पुन्हा सक्रिय झाली होती. त्यांच्याकडून देशातील काही प्रमुख व्यक्तींना इजा किंवा घातपात करण्याचा कट आखण्यात आल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. याच माहितीच्याआधारे एनआयएने आजची कारवाई केल्याचे सांगितले जाते. एनआयएने फेब्रुवारी महिन्यात दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर एनआयए सातत्याने दाऊदशी संबंधित मालमत्तांवर कारवाई करताना दिसत आहे.
-
National Investigation Agency (NIA) conducts raids at more than one dozen locations in Mumbai against Pakistan-based gangster Dawood Ibrahim's associates and a few hawala operators pic.twitter.com/mAUq4w8gul
— ANI (@ANI) May 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">National Investigation Agency (NIA) conducts raids at more than one dozen locations in Mumbai against Pakistan-based gangster Dawood Ibrahim's associates and a few hawala operators pic.twitter.com/mAUq4w8gul
— ANI (@ANI) May 9, 2022National Investigation Agency (NIA) conducts raids at more than one dozen locations in Mumbai against Pakistan-based gangster Dawood Ibrahim's associates and a few hawala operators pic.twitter.com/mAUq4w8gul
— ANI (@ANI) May 9, 2022
हेही वाचा - D Company re-activates : डी कंपनी पुन्हा सक्रिय मनी लाँडरिंग सिंडिकेटमध्ये डिजिटल वॉलेट, डार्कनेटचा वापर
मुंबईतील विविध ठिकाणी एनआयएचे छापे - एनआयएने बोरिवली, सांताक्रूझ, वांद्रे, नागपाडा, गोरेगाव, परळ येथील 20 ठिकाणी छापे टाकले आहेत. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार एनआयएने दाऊद इब्राहिम, डी कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला होता. ज्यावर ही चौकशी आणि छापेमारी सुरू आहे. डी कंपनी ही संयुक्त राष्ट्रांनी प्रतिबंधित दहशतवादी संघटना आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊदला 2003 मध्ये जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते. त्याच्यावर 25 दशलक्ष बक्षीसही ठेवण्यात आले होते.
केंद्रीय गृह मंत्रालय ऍक्शन मोडमध्ये - गृह मंत्रालयाने फेब्रुवारी 2022 मध्ये दाऊद इब्राहिमशी संबंधित प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला होता. राष्ट्रीय तपास संस्था ही देशातील सर्वात मोठी तपास संस्था आहे. याआधी ईडी दाऊदशी संबंधित प्रकरणांची चौकशी करत होती. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, डी कंपनी आणि दाऊद इब्राहिम टेरर फंडिंग, नार्को टेरर, ड्रग्स स्मगलिंग आणि फेक करन्सीमध्ये व्यापार करून भारतात दहशत पसरवण्याचे काम करत आहेत.
-
NIA detains Salim Fruit following a raid at his residence in Mumbai. He is an associate of Dawood Ibrahim. Some important documents also seized.
— ANI (@ANI) May 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Raids at several locations in Mumbai linked to gangster Dawood Ibrahim's associates and a few hawala operators are underway by NIA. pic.twitter.com/v1pdEw1RJw
">NIA detains Salim Fruit following a raid at his residence in Mumbai. He is an associate of Dawood Ibrahim. Some important documents also seized.
— ANI (@ANI) May 9, 2022
Raids at several locations in Mumbai linked to gangster Dawood Ibrahim's associates and a few hawala operators are underway by NIA. pic.twitter.com/v1pdEw1RJwNIA detains Salim Fruit following a raid at his residence in Mumbai. He is an associate of Dawood Ibrahim. Some important documents also seized.
— ANI (@ANI) May 9, 2022
Raids at several locations in Mumbai linked to gangster Dawood Ibrahim's associates and a few hawala operators are underway by NIA. pic.twitter.com/v1pdEw1RJw
एवढेच नाही तर दाऊद इब्राहिम आणि त्याची डी कंपनी लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि अल कायदाच्या माध्यमातून भारतात दहशतवादी कारवाया करत आहेत. या यादीत छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेमन यांचाही समावेश आहे. एनआयए केवळ दाऊद इब्राहिम आणि त्याच्या डी कंपनीच्या दहशतवादी कारवायांचा तपास करणार नसून, अंडरवर्ल्ड डॉनचे गुंड छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेनन, इक्बाल मिर्ची, दाऊदची बहीण हसिना पारकर यांच्याशी संबंधित दहशतवादी कारवायांचाही तपास करणार आहे. सध्या दाऊद इब्राहिम पाकिस्तानात लपून बसला असून कराचीच्या पॉश भागात तो आपले लपण्याचे ठिकाण बदलत आहे.
एक विशेष गट सक्रिय - मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईत दाऊदचा एक विशेष गटही काही दिवसांपासून सक्रिय झाला आहे. देशातील महत्त्वाच्या व्यक्तींना इजा पोहोचवण्याचा कट हा गट आखत आहे. याबाबत एनआयएला काही दिवसांपुर्वी माहिती मिळाली होती. त्यामुळे या टोळीला वेळीच आळा घालण्यासाठी ही छापेमारी असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह पारकरची चौकशी