ETV Bharat / city

Reward On Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमसह 'या' अंडरवर्ल्ड डॉनची माहिती देणाऱ्याला मिळणार लाखोंची बक्षीसे - दाऊद इब्राहिमच्या माहितीसाठी बक्षीस

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची Underworld don Dawood Ibrahim माहिती देणाऱ्या व्यक्तीला 25 लाखाचं बक्षीस राष्ट्रीय तपास यंत्रणा National Investigation Agency अर्थात एनआयएने NIA जाहीर केले आहे.

Dawood Ibrahim
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम
author img

By

Published : Sep 1, 2022, 11:34 AM IST

Updated : Sep 1, 2022, 12:32 PM IST

मुंबई - भारताततील मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची Underworld don Dawood Ibrahim माहिती देणाऱ्या व्यक्तीला 25 लाखाचं बक्षीस राष्ट्रीय तपास यंत्रणा National Investigation Agency अर्थात एनआयएने NIA जाहीर केले आहे. दाऊद इब्राहिम याच्यावर मुंबई सह अनेक देशांमध्ये आतंकवादी कारवाया स्मगलिंग यासारखे अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असून त्याला पकडण्याकरिता मदत करणाऱ्या व्यक्तीला Reward for information on Dawood Ibrahim बक्षीस जाहीर केले आहे.

माहिती देणाऱ्याला 25 लाख रुपये - राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्याला 25 लाख रुपये तर छोटा शकीलची Chhota Shakeel माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपये देण्यात येतील. तसंच हाजी अनिस शेख, जावेद चिकना आणि टायगर मेनन यांच्यावर प्रत्येकी 15 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने दाऊद इब्राहिमच्या संबंधातील सर्व गुन्हे राष्ट्रीय तपास यंत्रणाकडे वर्ग केल्यानंतर दाऊद इब्राहिम Dawood Ibrahim विरोधात तपास यंत्रणेने मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात छापेमारी केल्यानंतर या प्रकरणात छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुटला अटक करण्यात आली होती. दाऊद इब्राहिमला दहशतवादी कारवाया करिता पैसे पाठवत असल्याचा आरोप सलीम फ्रुट वर एनआयएकडून करण्यात आला होता.

दहशतवादी राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याचा प्लान - भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी दाऊदनं सध्या एक युनिट स्थापन केली असल्याची माहिती गुप्तचर खात्याला मिळाली आहे. येत्या काळात भारतात दहशतवादी हल्ला किंवा देशातील बड्या राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याचा प्लान या युनिटकडून राबवला जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एनआयए सतर्क झाली असून भारतासाठी वॉन्टेड असलेल्या गुन्हेगारांवर बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.

मोस्ट वॉन्टेड - पाकिस्तानातील कराची येथे राहणारा आणि 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांसह भारतात अनेक दहशतवादी कारवायांसाठी वाँटेड असलेला इब्राहिम याच्यावर 2003 मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं 25 लाख डॉलरचं बक्षीस याआधीच जाहीर केलं आहे. दाऊद भारतातील मोस्ट वॉन्टेड पुरुषांपैकी एक आहे. लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईद, जैश-ए-मोहम्मद प्रमुख मौलाना मसूद अझहर, हिजबुल मुजाहिदीनचा संस्थापक सय्यद सलाहुद्दीन आणि त्याचा जवळचा साथीदार अब्दुल रौफ असगर हे देखील मोस्ट वॉन्टेड आहेत.

भारतातील शहरांमध्ये हल्ला करण्यासाठी एलईटी - डी कंपनीने प्रमुख राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी दहशतवादी गट आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था यांच्या मदतीने भारतात एक विशेष युनिट स्थापन केल्याची माहिती मिळाल्यानंतर एनआयएने यावर्षी फेब्रुवारीमध्ये इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध नवीन गुन्हा नोंदवला. व्यापारी तसेच भारतातील शहरांमध्ये हल्ला करण्यासाठी एलईटी जेएम आणि अल-कायदाच्या दहशतवादी आणि स्लीपर सेलला पाठिंबा देण्यासाठी दाऊदचे युनिटा काम करत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली आहे.

तपासाचा एक भाग म्हणून NIA ने या वर्षी मे महिन्यात 29 ठिकाणी छापे टाकले होते ज्यात हाजी अली दर्गा आणि माहीम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवानी यांचाही समावेश होता. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी समीर हिंगोरा छोटा शकीलचा मेहुणा सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट; गुड्डू पठाण, इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचे नातेवाईक आणि कय्युम शेख, भिवंडीचा रहिवासी यांच्या घरी धाडी टाकण्यात आल्या होत्या.

कोण होता दाऊदचा उजवा हात? - मुंबई अंडरवर्ल्डचा डॉन म्हणवल्या जाणाऱ्या दाऊद इब्राहिमला कोण ओळखत नाही. दाऊदच्या डी कंपनीशी संबंधित एक व्यक्ती होती, ज्याला नंतर दाऊदचा उजवा हात म्हटले जाऊ लागले आणि त्याचे नाव छोटा शकील म्हणून ओळखले जाऊ लागले. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी छोटा शकील हा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आहे.

कोण होता छोटा शकील : दक्षिण मुंबईतील नागपाडा येथील रहिवासी असलेल्या छोटा शकीलचे खरे नाव मोहम्मद शकील बाबू शेख होते. 50 च्या दशकात जन्मलेला छोटा शकील सुरुवातीला ट्रॅव्हल एजन्सी चालवत होता. मात्र, त्यांच्या एजन्सीच्या कारवाया नेहमीच संशयास्पद राहिल्या आहेत. अनेक वर्षे या व्यवसायात राहिल्यानंतर 1988 मध्ये तो दाऊदच्या टोळीत सामील झाला. मात्र, त्यावेळी दाऊदचे सर्व काम छोटा राजन पाहत असे.

या वर्षी अटक : डी कंपनीत रुजू झाल्यानंतर तो दाऊदच्या इतर गुंडांसह खंडणी, अपहरण, सट्टेबाजीमध्ये सामील होता. त्याचवेळी छोटा शकील दाऊदशी जवळीक साधण्यासाठी आतमध्ये तणाव निर्माण झाला होता, पण त्यावेळी छोटा राजनच सर्वस्व होता. 1988 मध्ये छोटा शकीलला राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती, त्यानंतर तो चार महिने तुरुंगात होता. शकीलला जामीन मिळताच तो पळून गेला आणि दुबईला निघून गेला. हेच वर्ष होते जेव्हा दाऊदही भारत सोडून दुबईला गेला होता.

येथूनच झाले बॉम्बस्फोट : छोटा शकील, दाऊद दुबईत असतीलही, पण मुंबईचे माफिया राज दुबईच्याच आदेशावर काम करायचे. 1993 साली दुबईत बसून दाऊदने मुंबई साखळी बॉम्बस्फोटांची योजना आखली होती, तीही या दहशतवाद्यांनी घडवली होती. या हल्ल्यांच्या एका वर्षानंतर छोटा राजनने दाऊदची साथ सोडली आणि सर्व नियंत्रण छोटा शकीलच्या हातात आले.

हे दहशतवादी याच देशात स्थायिक : 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊद, छोटा शकील हे दोघेही पाकिस्तानात स्थायिक झाले. छोटा शकीलला एक मुलगा आणि दोन मुली अशी तीन मुले आहेत. तिच्या मुलींची नावे झोया आणि अनम असून दोघांचे लग्न कराचीमध्ये झाले आहे. त्याचवेळी शकीलच्या मुलाचे नाव इन्फॉर्मर शेख असे आहे.

छोटा राजनला मारण्याचाही प्रयत्न : 1994 मध्ये छोटा राजनने वेगळे होऊन स्वत:ची टोळी तयार केली तेव्हा दाऊद संतापला होता. त्यामुळे दाऊदने छोटा शकीलच्या माध्यमातून अनेकवेळा छोटा राजनला ठार मारण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्येक वेळी तो फरार झाला. 2000 मध्ये छोटा शकीलने छोटा राजनवर बँकॉकमध्ये हल्ला केला होता. काही वर्षांनंतर राजन ऑस्ट्रेलियात असताना, त्यावेळी छोटा शकीलने राजन तुरुंगात असतानाही त्याच्यावर हल्ला झाला होता.

छोटा शकीलचा मृत्यू गुलदसत्यातच - 2015 मध्ये छोटा शकीलने मुंबईतील काही बड्या बिल्डरांना त्याच्या गुंडांसह धमकावले होते. जेणेकरून खंडणी वसूल कराता येईल. त्याच वेळी, 2016 मध्ये, छोटा शकीलच्या सांगण्यावरून अनेक बड्या नेत्यांची हत्या करण्यात आली होती, ज्यामध्ये गुजरात एटीएस नंतर छोटा शकीलच्या शार्प शूटर नदीम रसूलला त्याच्या साथीदारांसह पकडण्यात अपयशी ठरले होते. 2017 मध्ये, छोटा शकीलच्या मृत्यूची बातमी देखील आली होती, ज्यामध्ये त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्याला रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, छोटा शकीलच्या मृत्यूला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

हेही वाचा - Two Militants killed in Sopore encounter : जम्मू काश्मीरच्या सोपोरमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांना धाडले यमसदनी

Last Updated : Sep 1, 2022, 12:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.