मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या प्रकरणाला शनिवारी नाट्यमय वळण मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पवार कुटुंबीयांमध्ये फुट पडली आहे. अजित पवारांच्या कृतीवर सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअॅपवरून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
![सुप्रिया सुळे यांचे नवीन व्हॉट्सअॅप स्टेटस](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5164494_sule.jpg)
सुप्रिया सुळे यांनी शनिवारपासून राज्यातील राजकिय परिस्थितीसंबधित व्हॉट्सअॅप स्टेटस अपडेट केले आहेत. सुळे यांनी शरद पवार यांचा साताऱ्याच्या सभेतील पावसात भिजतानाचा फोटो स्टेटसला ठेवला आहे. 'हे चित्र आयुष्यभर लढण्याची, संघर्ष करण्याची प्रेरणा देत राहील', अशी ओळ पवारांच्या फोटो खाली टाकली आहे.
![सुप्रिया सुळे यांचे नवीन व्हॉट्सअॅप स्टेटस](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5164494_sule2.jpg)
हेही वाचा - महाराष्ट्राच्या सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी पुन्हा सुनावणी, रविवारी झाला असा युक्तीवाद
प्रामाणिकपणा आणि कष्ट कधीही वाया जात नाही, रस्ता कठीण आहे पण या मार्गाने गेलो तर जास्त काळ टिकाव लागेल, या आशयाचेही एक स्टेटस सुप्रिया यांनी ठेवले. या माध्यमातून सुप्रिया यांनी आपण अजित पवारांच्या निर्णयामुळे किती दुखावलो गेलो आहोत, हे व्यक्त केले आहे. राज्यातील राजकारणात सुप्रिया यांनी कायम अजित पवारांना पाठिंबा देण्याचे काम केले.