मुंबई - मुंबईत डिसेंबरपासून कोरोनाची तिसरी लाट आली आहे. या लाटे दरम्यान बहुतेक नागरिक सर्दी खोकला आणि तापाने आजारी आहेत. यामुळे नागरिकांनी सेल्फ
टेस्टिंग किटचा वापर करून चाचण्या करण्याला प्राधान्य दिले आहे. मात्र यामुळे पॉजिटीव्ह रुग्ण समोर येत नसल्याने पालिकेने सेल्फ टेस्ट किटबाबत (Corona Self Testing Kits) नियमावली जाहीर केली आहे. घरगुती चाचण्या किंवा रॅपिड अँटीजेन संच उत्पादक, विक्रेते यांना किटच्या विक्रीबाबतचे तपशील पालिकेला देणे आता बंधनकारक असणार आहे. पालिकेने या किटच्या वापराबाबतची नियमावली गुरुवारी जाहीर केली आहे.
रोज माहिती द्यावी लागणार -
घरगुती किंवा रॅपिड अँटीजेन चाचण्यांचा वापर वाढला असून याचे अहवाल मात्र वापरणाऱ्यामार्फत संबंधित यंत्रणेला दिले जात नाहीत . त्यामुळे आता वापरकर्त्यांचा पाठपुरावा करणारी यंत्रणा पालिकेने सुरू केली आहे. नव्या नियमावलीनुसार, या चाचण्यांचे संच उत्पादन करणाऱ्या कंपन्या, औषध विक्रते किंवा वितरक यांना संच विक्री केलेल्यांची तपशीलवार माहिती पालिकेने दिलेल्या ईमेल आयडीवर दररोज द्यावी लागणार आहे.
निर्मात्याची भूमिका -
होम टेस्टिंग अँटीजेन किटचे उत्पादक/वितरकांनी क्रमांकाची माहिती द्यावी. मुंबईतील केमिस्ट/फार्मसी/मेडिकल स्टोअर्स/डिस्पेन्सरी यांना विकल्या गेलेल्या किटचे फॉर्म A मध्ये आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (FDA) यांना ईमेल आयडी whogmp.mahafda@gmail.com वर तसेच MCGM च्या एपिडेमियोलॉजी सेलला ईमेलवर आयडी ही माहिती उपलब्ध करून देणे उत्पादकांना बंधनकारक करण्यात आली आहे.
केमिस्ट/फार्मसी/मेडिकल स्टोअर/दवाखान्याची भूमिका -
केमिस्ट/फार्मसी/मेडिकल स्टोअर दवाखाने ग्राहकांना विकल्या गेलेल्या होम टेस्टिंग अँटीजेन किटचा तपशील 'बी' फॉर्ममध्ये आयुक्त, FDA यांना ईमेल आयडी whogmp.mahafda@gmail.com वर तसेच MCGM च्या एपिडेमियोलॉजी सेलला ईमेल आयडीवर द्यावा. mcgm.hometests@gmail.com.
केमिस्ट/फार्मसी/मेडिकल स्टोअर/ दवाखाने होम टेस्टिंग अँटीजेन किट्सच्या खरेदीदाराला बिल जारी करतील आणि ज्या ग्राहकांना होम टेस्टिंग अँटीजेन किट्स विकल्या जातात त्यांची नोंद खाली दिलेल्या फॉरमॅटमध्ये ठेवली जाईल. त्याचप्रमाणे या स्वरूपातील माहिती केमिस्ट/फार्मसी/मेडिकल स्टोअर/डिस्पेन्सरी यांनी दररोज संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत आयुक्त, FDA यांना ईमेल whogmp.mahafda@gmail.com वर तसेच एपिडेमियोलॉजी सेल, MCGM यांना mcgm.hometests@gmail.com या ईमेल आयडीवर शेअर केली जाईल.
आयुक्त, FDA यांची भूमिका -
आयुक्त, FDA हे मुंबईतील खरेदार नागरिक सर्व केमिस्ट/फार्मसी/मेडिकल स्टोअर्स आणि वितरकांच्या होम टेस्टिंग अँटीजेन किट्सच्या वितरण आणि विक्रीवर देखरेख ठेवतील. आयुक्त, FDA यांच्याकडून केमिस्ट/फार्मसी/मेडिकल स्टोअर/डिस्पेन्सरी यांना किट खरेदी करणार्या व्यक्तीला दिलेल्या ऍपवर चाचणी अहवाल कळवण्यास सांगितले जाईल.
एपिडेमियोलॉजी सेल आणि वॉर्ड टीम, एमसीजीएमची भूमिका -
उत्पादक, वितरक, केमिस्ट, फार्मसी, मेडिकल स्टोअर्स इत्यादींकडून होम टेस्टिंग अँटीजेन किट्सशी संबंधित डेटा इमेलद्वारे प्राप्त केला जाईल, त्यावर एपिडेमियोलॉजी सेल, MCGM द्वारे परीक्षण केले जाईल आणि पुढील आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संबंधित वॉर्डकडे पाठवले जाईल. व्यक्तीने ICMR वेबसाइट / अॅपवर निकाल अपलोड करावा आणि रुग्णाच्या किंवा संबंधित व्यक्तीच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जाईल याची खात्री करण्यासाठी वॉर्ड टीम काम करेल.