ETV Bharat / city

Mukesh Ambani New Car : मुकेश अंबानींच्या ताफ्यात नव्या गाडीची एन्ट्री, आतापर्यंतची सर्वात महागडी कार

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश ( Mukesh Ambani ) अंबानी यांचे नाव घेतले जाते. अफाट संपत्तीचे मालक मुकेश अंबानी यांच्याकडे अनेक महागडे वाहने आहेत. नुकतेच त्यांच्या गाड्याच्या ताफ्यात १३.१४ कोटींची अल्ट्रा-लक्झरी रोल्स रॉयल्स ( Mukesh Ambani New Car ) दाखल झाली असून नुकतीच त्याची नोंदणी करण्यात आली आहे.

Mukesh Ambani New Car
Mukesh Ambani New Car
author img

By

Published : Feb 4, 2022, 10:31 PM IST

मुंबई - आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश ( Mukesh Ambani ) अंबानी यांचे नाव घेतले जाते. अफाट संपत्तीचे मालक मुकेश अंबानी यांच्याकडे अनेक महागडे वाहने आहेत. नुकतेच त्यांच्या गाड्याच्या ताफ्यात १३.१४ कोटींची अल्ट्रा-लक्झरी रोल्स रॉयल्स ( Mukesh Ambani New Car ) दाखल झाली असून नुकतीच त्याची नोंदणी करण्यात आली आहे. देशातील आतापर्यंतची सर्वात महागडी कार खरेदी आहे, असे वरिष्ठ आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले.

अशी आहे मुकेश अंबानीची गाडी -

देशातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवणारे मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे कायम चर्चेत असतात. त्यांच्याकडे सर्वात महागड्या गाड्या आणि आलिशान घरे आहेत. मात्र, आता मुकेश अंबानीने देशातील आतापर्यंतची सर्वात महागडी कार खरेदी केल्याने पुन्हादा चर्चेत आले आहेत. मुंबईतील ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयात मुकेश अंबानीची अल्ट्रा-लक्झरी रोल्स रॉयल्स गाडी नोंदणी करण्यात आली आहे. या गाडीची किंमत १३.१४ कोटींची असून २०१८मध्ये प्रथम ही गाडी लॉन्च झाली. तेव्हा कारची मूळ किंमत ६.९५ कोटी रुपये होती. परंतु काही बदलांमुळे किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कंपनीने या कारसाठी 'टस्कन सन' रंगाची निवड केली आहे. एक विशेष नंबर प्लेटदेखील मिळवली आहे. या कारची नोंदणी ३० जानेवारी २०३७ पर्यंत वैध आहे. त्या कारसाठी २० लाख रुपयांचा एक-वेळ कर भरला गेला आहे आणि आणखी ४० हजार रुपये रस्ता सुरक्षा करासाठी भरले गेले आहेत.

व्हीआयपी नंबर मिळवण्यासाठी 12 लाख रुपये -

भारतात खरेदी केलेली सर्वात महागडी कार देखील असू शकते. महागड्या रोल्स रॉयल्स सोबत व्हीआयपी नंबर मिळवण्यासाठी १२ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. या गाडीचा क्रमांक ०००१ आहे. साधारणपणे एका व्हीआयपी क्रमांकाची किंमत ४ लाख रुपये असते. परंतु सध्याच्या मालिकेतील निवडलेला क्रमांक आधीच घेतला असल्याने नवीन मालिका सुरू करावी लागली. परिवहन आयुक्तांच्या परवानगीने आरटीओ कार्यालये नोंदणी चिन्ह 0001 नियुक्त करण्यासाठी एक नवीन मालिका सुरू करू शकतात. ज्यासाठी अर्जदाराला नियमित क्रमांकासाठी निर्देशित केलेल्या शुल्काच्या तिप्पट शुल्क भरावे लागते, असे आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा - Mumbai Corona Update : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी ८०० च्या वर रुग्ण, ८४६ नव्या रुग्णांची नोंद, ७ जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.