ETV Bharat / city

मुंबई पालिकेची 'ती' कारवाई फक्त दिखावा... माहिती अधिकारात उघड - New Look Construction Mumbai

आर्थिक परिस्थिती खराब होत असल्याने महसूल वाढीसाठी मुंबई महापालिकेने मालमत्ता कर वसुलीकडे आपला मोर्चा वळवला आहे. मालमत्ता कर न भरणाऱ्यांची संपत्ती जप्त केली जात आहे.

New Look Construction Mumbai Municipal Property Tax
मुंबई माहिती अधिकार कार्यकर्ता निखिल डिसोझा
author img

By

Published : Mar 4, 2020, 1:03 PM IST

मुंबई - वडाळा येथील न्यू लूक कंस्ट्रक्शनच्या ६ इमारतींकडून ६ कोटी ६३ लाखांचा कर थकवण्यात आल्याने वर्षभरापूर्वी जप्तीची कारवाई करण्यात आली. मात्र, एक वर्ष होऊनही अद्याप पुढील कारवाई करून मालमत्ता कर व दंड वसूल करण्यात आलेला नाही. यामुळे मालमत्ता कर वसुलीसाठी करण्यात आलेली जप्ती हा दिखावा असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते निखिल डिसोझा यांनी म्हटले आहे.

मालमत्ता करासाठी पालिकेची जप्तीची कारवाई हा फक्त दिखावा; माहिती अधिकार कार्यकर्त्याने उघड केला प्रकार

हेही वाचा... परीक्षेच्या आदल्या दिवशी आईचा मृत्यू, अंत्यदर्शन घेऊन तिने दिला दहावीचा पेपर

वडाळा बेस्ट डेपोजवळ असलेल्या झोपडपट्टीच्या जागेवर न्यू लूक कंस्ट्रक्शन या विकासकाकडून राम नगर को. ऑप. हाऊसिंग सोसायटीच्या तीन, सिद्धार्थ नगर को. ऑप. हाऊसिंग सोसायटीची एक, विक्रीसाठी भव्या हाईट्स को. ऑप. हाऊसिंग सोसायटीची एक, एसआरएच्या विठ्ठल रखुमाई को. ऑप. हाऊसिंगच्या तीन अशा एकूण सहा इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. २००३ आणि २००५ मध्ये बांधलेल्या या इमारतींचा कर विकासकाने पालिकेकडे भरलेला नाही. या कराची रक्कम सध्या एकूण ६ कोटी ६३ लाख ९५ हजार ८०३ रुपये इतकी आहे. या इमारतीचा कर भरावा म्हणून पालिकेकडून सतत विकासक आणि या इमारतींना नोटीस बजावण्यात आली. मात्र, त्यानंतरही विकासक कर भरत नसल्याने पालिकेने जानेवारी २०१९ मध्ये विकासकाच्या एसआरएच्या तीन इमारती जप्त करण्यासाठी नोटीस बजावली. त्याप्रमाणे जप्तीची कारवाईही करण्यात आली. मात्र, एक वर्षाहून अधिक काळ झाला तरी अद्याप कोणत्याही प्रकारची पुढील कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे पालिकेचा मालमत्ता कर आणि दंड अद्याप वसूल करण्यात आलेला नाही.

हेही वाचा... जयपूरमधील कोरोनाग्रस्त इटालियन नागरिकाच्या पत्नीलाही झाली विषाणूची लागण..

मुंबई महापालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी धडक कारवाई सुरू केली आहे. मेस्को एअरलाईन्स या विमान कंपनीने पालिकेच्या मालमत्ता कर थकवल्याने दोन हेलिकॉप्टर जप्त केली आहेत. मग न्यू लूक कन्स्ट्रक्शनची ६ कोटी ६३ लाख रुपयांची थकबाकी असताना जप्ती नंतरची कारवाई करून मालमत्ता कर आणि दंड का वसूल केला जात नाही, असा प्रश्न निखिल डिसोझा यांनी उपस्थित केला आहे. पालिकेकडून न्यू लूक कन्स्ट्रक्शनकडून मालमत्ता कर आणि दंड वसूल करण्यात आला नसल्याने देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, पालिका आयुक्तांना पत्र लिहिले असल्याचं माहिती डिसोझा यांनी दिली.

५२० कुटुंब रस्त्यावर येणार..?

विठ्ठल रखुमाई आणि रामनगर सोसायटीच्या नावाने असलेल्या पाच इमारतींमध्ये ४३० कुटुंब राहतात. तसेच विकासकाने विक्रीसाठी बांधलेल्या भव्य हाईटस या इमारतीमध्ये ९० कुटुंब राहतात. विकासकाने या इमारतींचे कर पालिकेकडे न भरल्याने पालिकेने एसआरएच्या इमारती पालिकेने जप्त केल्या आहेत. विकासकाने ६ कोटी ६३ लाखांचा कर न भरल्यास या ५३० कुटुंबाना रस्त्यावर येतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

कोणत्या इमारतीचा किती कर थकवला ?

  1. राम नगर को. ऑप. हाऊसिंग सोसायटी - ६८ लाख २ हजार ६२०
  2. राम नगर को. ऑप. हाऊसिंग सोसायटी - १ कोटी ७३ लाख ०९ हजार २९९
  3. राम नगर को. ऑप. हाऊसिंग सोसायटी - ६३ लाख १२ हजार ९१०
  4. सिद्धार्थ नगर को. ऑप. हाऊसिंग सोसायटी ए आणि बी विंग - १ कोटी ९९ लाख ८६ हजार ६१९
  5. भव्या हाईट्स को. ऑप. हाऊसिंग सोसायटी ए आणि बी विंग - १ कोटी २३ लाख ७८ हजार ३६९
  6. विठ्ठल रखुमाई को. ऑप. हाऊसिंग सोसायटी - ३६ लाख ५ हजार ९८६

    एकूण - ६ कोटी ६३ लाख ९५ हजार ८०३ रुपये कर थकीत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.