ETV Bharat / city

मंडळी पाहिलात का? सॅनिटायझर फवारणी करणारा बाप्पा..!

'सेन्सर' आणि 'स्प्रे'चा उपयोग करून मूर्तीच्या हातात असलेल्या शस्त्रातून चक्क सॅनिटायझर फवारण्याची प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर या मूर्तीच्या मुकुट आणि दागिन्यात एलईडी लाईट्स बसविल्या असून त्यांचा वेग, चमकण्याचे प्रकार आणि रंग रिमोट कंट्रोलद्वारे बदलता येणे शक्य आहे.

गणपती
गणपती
author img

By

Published : Aug 18, 2020, 10:15 AM IST

मुंबई - गणेशोत्सव जवळ आला असताना यंदा गणेशभक्तांना कोरोनाची चिंता आहे. गणपतीच्या दर्शनाला जाताना सामाजिक अंतर ठेवणे, मास्क लावणे आणि मुख्य म्हणजे सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे. घाटकोपरमधील नितीन चौधरी आणि संगीता चौधरी या दाम्पत्याने गणपतीच्या समोर दर्शनाला गेल्यास तुमच्यावर आपोआप सॅनिटायझर फवारले जाईल, अशी व्यवस्था केली आहे. घाटकोपरच्या अमृतनगर विभागात असलेल्या प्रांजल गणेश कला केंद्रात गणेश भक्तांसाठी अनोखी गणेश मूर्ती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

घाटकोपर

'सेन्सर' आणि 'स्प्रे'चा उपयोग करून मूर्तीच्या हातात असलेल्या शस्त्रातून चक्क सॅनिटायजर फवारण्याची प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर या मूर्तीच्या मुकुट आणि दागिन्यात एलईडी लाईट्स बसविल्या असून त्यांचा वेग, चमकण्याचे प्रकार आणि रंग रिमोट कंट्रोलद्वारे बदलता येणे शक्य आहे.

हेही वाचा - मुंबईत रिक्त इमारत शेजारील घरांवर कोसळली..मलब्याखाली दोघेजण सापडले

नाट्यक्षेत्रात 'लाईटस सप्लायर' म्हणून काम करणारे नितीन चौधरी गेले दहा वर्षे गणेशमूर्ती विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. गणपतीची मूर्ती अधिकाधिक आकर्षक करण्यासाठी ते पूर्वी मोती, मनी, डायमंड इत्यादींचा वापर करीत होते. परंतु, पाच वर्षांपूर्वी त्यांनी गणपतीच्या मूर्तीमध्ये एलईडी लाईट लावून मूर्ती आणखी रेखीव करण्याचा प्रयत्न केला. याला मोठा प्रतिसाद मिळाला.

गणपती
गणपती

यंदाचे कोरोनाचे संकट आणि त्यावर गणपती बाप्पाने मात करावी, अशी संकल्पना राबवायची होती. यासाठी गणपतीच्या शस्त्रातून कोरोनाचा नाश होत आहे, ही संकल्पना प्रत्यक्ष सॅनिटायजरचा स्प्रे करून राबविता येईल का? यासाठी मी प्रयोग सुरू केले. त्यातून सेन्सरचा वापर करून स्प्रे करता येईल, असे सुचले आणि गणपतीचे त्रिशूल तसेच इतर शस्त्रात स्प्रे बसविले आणि त्याला सेन्सर जोडले. ज्या वेळेस गणेशभक्त मूर्ती समोर जातात तेव्हा आपोआप गणेशभक्तांवर सॅनिटायझर फवारले जाते, असे नितीन चौधरी यांनी सांगितले.

हेही वाचा - यावर्षी मुंबईत बाप्पाचे तीन ते चार दिवस आधीच आगमन... घरातूनच द्यावा लागणार निरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.