ETV Bharat / city

Coronavirus New Cases Today : धोका वाढला! देशात 20 हजार 557 नवीन कोरोनाबाधित, 44 रुग्णांचा मृत्यू

author img

By

Published : Jul 28, 2022, 11:13 AM IST

Coronavirus New Cases Today : देशात मागील काही दिवसांच्या रुग्णवाढीनंतर कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. देशातील सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीबाबत जाणून घ्या.

Coronavirus New Cases Today
Coronavirus New Cases Today

मुंबई - देशात आज 20557 कोरोना रुग्णांची ( Corona patient ) नोंद करण्यात आली आहे. तर 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार 19216 रुग्णांना घरी सोडण्यात ( Corona patient discharges ) आले. तर 146323 वर सक्रिय रुग्ण आहे. आणि सकारात्मकता दर 0.33 टक्के इतका आहे.

राज्यात 2138 नवे कोरोनाबाधित; 8 मृत्यू - राज्यात बुधवारी 2138 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर (New Corona Cases in Maharashtra) पडली आहे. तर दिवसभरात एकूण 2269 रुग्ण कोरोनामुक्त (Corona Patients Discharged) होऊन घरी परतले आहेत. बुधवारी नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहेत. तसेच मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या आता कमी झाली आहे. त्यामुळे पालिकेनेही जम्बो कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात एकूण 13943 सक्रिय रुग्ण आहेत.

राज्याची कोरोनाची आकडेवारी - राज्यात आज आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका आहे. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,77,288 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.98 टक्के इतकं झाले आहे.

मुंबईतील सर्वात मोठी कोविड सेंटर्स बंद - मुंबईमधील मोठी कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. कोरोना रुग्णांची संख्या घटल्यामुळे ‘जम्बो सेंटर’ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात तीन केंद्रे यापूर्वीच बंद करण्यात आली आहेत. तर दुस-या टप्प्यात आता पाच केंद्रे बंद करणार आहेत. मात्र, सेव्हन हिल्स रुग्णालयासह विविध रुग्णालयांमध्ये ‘कोविड’ उपचार सुविधा कार्यरत राहणार आहे. वांद्रे - कुर्ला संकुल, रिचर्डसन्स ऍण्ड क्रुडास भायखळा, रिचर्डसन्स ऍण्ड क्रुडास मुलुंड, एन. एस. सी. आय. वरळी आणि मालाड येथील ‘जम्बो कोविड केअर केंद्रे’ बंद करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे.

23 टक्के अधिक रुग्ण - गेल्या 24 तासांत देशात कोविड-19 ची 18313 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत, जी मंगळवारच्या तुलनेत सुमारे 23 टक्क्यांनी जास्त आहे. त्याचबरोबर या काळात 57 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यासह कोरोना विषाणूची लागण झालेले 20 हजार 742 रुग्ण बरे होऊन त्यांच्या घरी पोहोचले आहेत. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या (कोविड-19 सक्रिय प्रकरणे) 1 लाख 45 हजार 26 आहे. यापूर्वी मंगळवारी देशात 14,830 कोरोनाची नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली होती, तर या काळात 36 जणांचा मृत्यू झाला होता. देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांत देशात 18313 नवीन रुग्ण आढळले आहेत. मंगळवारच्या तुलनेत आज कोरोनाच्या प्रकरणांमध्ये सुमारे 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोना संसर्गामुळे आणखी 57 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असून, त्यानंतर देशातील या आजाराने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 5 लाख 26 हजार 167 वर पोहोचली आहे.

हेही वाचा - Ajit Pawar Criticized : राज्याचा कारभार वाऱ्यावर सोडला; शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत : अजित पवारांची टीका

हेही वाचा - Arpita Mukherjee : अबब..! अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरात सापडले 28 कोटींचे घबाड, पैसे भरायला लागले 10 ट्रंक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.