ETV Bharat / city

मुंबई कोरोना अपडेट : 746 नवे रुग्ण; 15 रुग्णांचा मृत्यू, रुग्ण दुप्पटीचा कालावधी 185 दिवसांवर

author img

By

Published : Nov 3, 2020, 10:32 PM IST

मुंबईत आज कोरोनाचे 746 नवे रुग्ण आढळले असून 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 8 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 8 पुरुष तर 7 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 59 हजार 860 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 320 वर पोहोचला आहे.

Mumbai
मुंबई

मुंबई - मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत वाढ होत होती. मात्र गेल्या काही दिवसात पुन्हा रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. आज मुंबईत कोरोनाच्या नव्या 746 रुग्णांची नोंद झाली असून 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तेवीस दिवसात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 69 वरून 185 दिवस इतका वाढल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

रुग्ण आणि मृतांचा आकडा कमी झाला -
मुंबईत आज (मंगळवारी) कोरोनाचे 746 नवे रुग्ण आढळले असून 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 8 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 8 पुरुष तर 7 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 59 हजार 860 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 320 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 939 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 31 हजार 541 वर गेला आहे. सध्या मुंबईत 17 हजार 444 सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी 185 दिवसांवर -
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 185 दिवस तर सरासरी दर 0.38 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 541 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 6 हजार 416 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 15 लाख 56 हजार 774 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.