ETV Bharat / city

Mumbai Corona Update मुंबईत रुग्णसंख्या हजारच्या वर, गुरुवारी १२०१ नवे रुग्ण - मुंबई कोरोना अपडेट

मुंबईत आज १८ ऑगस्टला ११,२५३ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १२०१ रुग्णांची नोंद झाली. आज २ मृत्यूंची नोंद झाली आहे. ६८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ३५ हजार ६८० रुग्णांची नोंद झाली आहे.

mumbai corona
कोरोना फाईल फोटो
author img

By

Published : Aug 18, 2022, 9:24 PM IST

मुंबई मुंबईत १० ऑगस्ट ते १४ ऑगस्टला रोज ८०० हुन अधिक रुग्णांची नोंद होत होती. बुधवारी १७ ऑगस्टला ९७५ रुग्णांची नोंद झाली. आज गुरुवारी रुग्णसंख्या हजाराच्या वर जाऊन १२०१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच २ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ४८२ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

१२०१ नवे रुग्ण मुंबईत आज १८ ऑगस्टला ११,२५३ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १२०१ रुग्णांची नोंद झाली. आज २ मृत्यूंची नोंद झाली आहे. ६८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ३५ हजार ६८० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख १० हजार २९८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५,७१२ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ९४९ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०७२ टक्के इतका आहे.

रुग्णसंख्येत वाढ मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. २ ऑगस्टला ३२९, ३ ऑगस्टला ४३४, ४ ऑगस्टला ४१०, ५ ऑगस्टला ४४६, ६ ऑगस्टला ४८६, ७ ऑगस्टला ४६५, ८ ऑगस्टला ४०७, ९ ऑगस्टला ४७९, १० ऑगस्टला ८५२, ११ ऑगस्टला ६८३, १२ ऑगस्टला ८७१, १३ ऑगस्टला ८६७, १४ ऑगस्टला ८८२, १५ ऑगस्टला ५८४, १६ ऑगस्टला ३३२, १७ ऑगस्टला ९७५, १८ ऑगस्टला १२०१ रुग्णांची नोंद झाली आहे.

११७ वेळा शून्य मृत्यूची नोंद मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ११७ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा, जुलै महिन्यात ६ वेळा तर ऑगस्ट महिन्यात ५ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.