मुंबई - मुंबईत गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या कालावधीत विषाणूच्या दोन लाटा आल्या व त्या थोपवण्यात पालिकेला (BMC Control Corona) यश आले आहे. पालिकेने केलेल्या उपाययोजना आणि नागरिकांनी दिलेली साथ यामुळे मुंबईमधील रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या घटली आहे. आज (13 डिसेंबर) कोरोनाचे 174 नवे रुग्ण (Today New Corona Cases) आढळून आले असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज 174 नवे रुग्ण -
आज (13 डिसेंबर) 174 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 7 लाख 65 हजार 471 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 7 लाख 44 हजार 784 रुग्ण बरे झाले आहेत. तर 16 हजार 359 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1751 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी 2557 दिवस इतका आहे. 6 डिसेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत कोरोना वाढीचा दर 0.03 टक्के इतका आहे.
13 इमारती सील -
मुंबईत कोणत्याही झोपडपट्टीत किंवा चाळीत कोरोना विषाणूचा रुग्ण आढळुन आल्यास ती चाळ, झोपडपट्टी सील केली जाते. सध्या चाळीत आणि झोपडपट्टीमध्ये रुग्ण आढळून येत नसल्याने एकही झोपडपट्टी सील करण्यात आलेली नाही. तर ज्या इमारतीमध्ये 5 रुग्ण आढळून येतात ती इमारत सिल केली जाते. मुंबईत सध्या 13 इमारती सील करण्यात आल्या आहेत.