ETV Bharat / city

New condition of Shinde group : भाजपसोबत चर्चा करतो, मगच शिवसेनेत येऊ शिंदे गटाची नवी अट - दीपक केसरकर - शिंदे गटाचे प्रवक्ते

नवीन सरकार स्थापनेनंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री ( Chief Minister Eknath Shinde ) पदाची शपथ घेतली. शिंदे गटाला चांगली मंत्री पदे मिळणार असल्याचेसुद्धा निश्चित झाले आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते ( Shinde Group Spokesperson ) आमदार दीपक केसरकर ( MLA Deepak Kesarkar ) यांनी मंत्रालयात माध्यमांशी बोलताना सांगितले की, आता आम्हाला परत शिवसेनेशी बोलायचे असेल तर तर पहिले भाजपची चर्चा करावी ( BJP Should be Discussed First ) लागेल, त्याशिवाय आम्हाला आता शिवसेनेशी चर्चा करता येणार आहे.

MLA Deepak Spokesperson Kesarkar
आमदार प्रवक्ते दीपक केसरकर
author img

By

Published : Jul 7, 2022, 1:56 PM IST

मुंबई : राज्याच्या सत्ता संघर्षानंतर शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात कटुता आली आहे. उद्धव ठाकरे यांनी सातत्याने बंडखोरांना परत येण्याचे आवाहन केले. परंतु, शिंदे गट ( Shinde group ) ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आता मात्र आम्हाला परत बोलायचे असेल, तर पहिले भाजपची चर्चा करावी ( BJP Should be Discussed First ) लागेल, असा नवी अटकळ शिंदे गटाची असल्याची माहिती प्रवक्ते आणि बंडखोर आमदार दीपक केसरकर ( MLA Deepak Kesarkar ) ( Shinde Group Spokesperson ) यांनी दिली. मंत्रालयात ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे स्वीकारणार मुख्यमंत्री पदाचा पदभार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा मंत्रालयात पदभार स्वीकारणार आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात सजावट करण्यात आली आहे. शिंदे गटाचे आमदारही मोठ्या संख्येने मंत्रालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते आणि दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांच्यासह शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. नुकतेच भावना गवळी यांना लोकसभा शिवसेनेच्या प्रतोद पदावरून हटवून खासदार राजन विचारे यांची नेमणूक केली आहे. शिंदे यांनी यावरही भाष्य केले.

शिवसेनेकडून भावना गवळींचा अपमान : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना विधिमंडळ गटनेते पदावरून तत्काळ उचलबांगडी केली. त्यानंतर माणसे पाठवून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. खासदार भावना गवळी यांच्याबाबतही असेच झाले आहे. आधी जखम केली जाते मग त्यावर मलम लावण्याचा प्रयत्न केला जातो, ही पद्धत चुकीची आहे. शिवसेनेने याबाबत विचार करायला हवा.

समस्त महिलांचा अपमान : शिवसेनेत हे पहिल्यांदा घडताना पाहायला मिळत आहे. राऊत यांनी त्यांच्या नेत्याला हे सांगायला हवे. तसेच आधी जखम करून त्यावर नंतर मलम लावण्यापेक्षा याबाबत विचार करावा, असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. भावना गवळीचा अपमान होताना पाहायला मिळत आहे. पाच वेळा खासदार त्या होत्या त्यांना बोलवायला हवं होते आणि चर्चा करायला हवी होती. तसे झाले नाही, त्यामुळे समस्त महिला वर्गाचा अपमान करण्यात आल्याचे केसरकर म्हणाले.

आमचा कोणताही गट नाही : शिवसेना नक्की कोणाची, यावरून वादंग सुरू आहे. मात्र, आमचा गट नाही आम्ही शिवसैनिक आहोत. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी बोलावून पाठ थोपटली असती आणि माझा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला, असे म्हटले असते. आताही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला आमचे शिवसैनिक आहेत, असे म्हणायला हवे, असे केसरकर म्हणाले.

आता भाजपसोबत चर्चा करा : शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत परतण्याचे आवाहन केले. शिंदे गटाने त्याविरोधात भूमिका घेतली. मात्र, आता पक्षप्रमुख उद्धव यांनी आम्हाला बोलावल्यास आणि आम्हाला माघारी जायचे असेल तर आम्हाला भाजप सोबतच्या वरिष्ठ नेत्यांसोबतसुद्धा चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल, असे केसरकर यांनी सांगितले. तसेच उद्धव ठाकरे यांनी आम्हाला आशीर्वाद देऊन सुप्रीमो व्हायला हवे मंत्रीपद घ्यायला नको, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : Bhavana Gawali : महाराष्ट्रातील झटक्यानंतर शिवसेना सावध; प्रतोद पदावरुन भावना गवळींची उचलबांगडी

हेही वाचा : अरे संदीपान भूमरेंनी तर मंत्री झाल्यावर माझ्यासमोर लोटांगण घातलं होत, पाहिजे तर CCTV फुटेज देतो' - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.