मुंबई - मुंबईत आज पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची कमी नोंद कमी झाली आहे. आज नव्या 599 रुग्णांची नोंद झाली असून 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २८ दिवसात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 69 वरून 229 दिवस इतका वाढल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
रुग्ण आणि मृतांचा आकडा कमी झाला -
मुंबईत आज (सोमवारी) कोरोनाचे 599 नवे रुग्ण आढळून आले असून 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 19 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 15 पुरुष तर 5 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 65 हजार 142 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 462 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 507 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 37 हजार 209 वर गेला आहे. सध्या मुंबईत 16 हजार 923 सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 229 दिवसांवर -
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 229 दिवस तर सरासरी दर 0.30 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 498 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 6 हजार 208 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 16 लाख 25 हजार 637 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
या आधी कमी नोंद झालेली रुग्णसंख्या -
7 नोव्हेंबर 576 रुग्ण
2 नोव्हेंबर 706 रुग्ण
3 नोव्हेंबर 746 रुग्ण
6 नोव्हेंबर 792 रुग्ण
9 नोव्हेंबर 599 रुग्ण