ETV Bharat / city

Rape Threat To Widow Women : 'विधवांचा सन्मान केल्यास त्यांच्यावर बलात्कार करू', निलम गोऱ्हेंच्या कार्यालयात आले धमकीचे पत्र - विधवा बलात्कार धमकी पत्र

राज्य सरकारने शासन निर्णय काढून राज्यातील विधवा महिलांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनाचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि महिलांचा सन्मान करण्याचा निर्णय असल्याची प्रतिक्रिया विधानसभा परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोरे यांनी ( Neelam Gorhe On Widow GR ) व्यक्त केली. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास विधवा महिलांवर बलात्कार ( Neelam Gorhe Office Recived Letter Of Rape Threat ) करण्याची धमकी दिली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Rape Threat To Widow Women
Rape Threat To Widow Women
author img

By

Published : May 30, 2022, 4:03 PM IST

Updated : May 30, 2022, 4:39 PM IST

मुंबई - राज्य सरकारने नुकताच विधवा महिलांचा अपमान होणार नाही. यासाठी पतीच्या निधनानंतर काढून घेण्यात येणारी प्रतीके न काढण्याचा निर्णय ( Maharashtra Government Widow GR ) घेतला. राज्य शासनाचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि महिलांचा सन्मान करण्याचा निर्णय असल्याची प्रतिक्रिया परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोरे यांनी ( Neelam Gorhe On Widow GR ) व्यक्त केली. मात्र, यावेळी त्यांनी धक्कादाय खुलासा केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास विधवा महिलांवर बलात्कार ( Neelam Gorhe Office Recived Letter Of Rape Threat ) करण्याची धमकी दिली जात असल्याची माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.

प्रतिक्रिया

पुण्यात बैठक घेऊन जनजागृती - विधवा महिलांच्या सन्मानासाठी सर्व ग्रामपंचायतींनी पुढे यावे यासाठी शासनाने काढलेल्या दोन्ही शासन निर्णयांचे ग्रामपंचायतींनी चावडी वाचन करावे, असे आवाहन पुण्यामध्ये झालेल्या दहा जिल्ह्यांच्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली. या महिलांच्या पुनर्वसनासाठी समाजाने पावले उचलली पाहिजेत तसेच पती निधनानंतर प्रतीके काढून न टाकण्यासाठी महिलांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असेही या बैठकीत आवाहन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पती-पत्नी यांनी यासंदर्भात घोषणापत्र स्वतः भरून द्यावे असा निर्णयही घेण्यात आला.

नगरमधून बलात्काराची धमकी - दरम्यान, या बैठकीनंतर नगर जिल्ह्यामधून आपल्याला धमकी आल्याची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली आहे. यावेळी धमकी देणाऱ्या व्यक्तीने जर विधवा महिलांना सन्मान करणारा निर्णय लागू होऊन त्याची अंमलबजावणी झाली, तर अशा महिलांवर आम्ही बलात्कार करू, अशा पद्धतीने धमकी दिल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस योग्य ती कारवाई करेल, असेही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - राज्यसभा निवडणूक! भाजपने तिसरा उमेदवार दिला;घोडेबाजाराची शक्यता

Last Updated : May 30, 2022, 4:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.