ETV Bharat / city

26/11 सारखा डाव उधळला, स्लीपर सेल उध्वस्त करण्याची गरज; माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांचे मत - terrorists sleeper cell

भारतात दहशतवादी कारवाया करण्याचा डाव नुकताच दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याच प्रकरणात मुंबईमधून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्वजण कुख्यात डॉन दाऊदचे हस्तक असल्याचे समोर आले आहे.

Dhanraj Vanjari
माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी
author img

By

Published : Sep 20, 2021, 7:41 PM IST

मुंबई - मुंबईसह देशभरात २६ / ११ सारखा घातपात घडवून आणण्याचा डाव दाऊदच्या हस्तकांचा होता. हा डाव सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला आहे. सुरक्षा यंत्रणांनी हा डाव उधळला असला तरी यामुळे पुन्हा एकदा दाऊदचे नेटवर्क आजही कार्यरत असल्याचे समोर आले आहे. स्लीपर सेल म्हणून काम करणारे हे नेटवर्क वेळीच उध्वस्त करण्याची गरज असल्याचे मत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनी व्यक्त केले आहे.

माहिती देताना माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी

हेही वाचा - उमा भारती बरळल्या, म्हणाल्या नोकरशाहीची काही औकात नाही, नेत्यांची चप्पल उचलते

  • २८ वर्षांनी दाऊदचे नाव -

भारतात दहशतवादी कारवाया करण्याचा डाव नुकताच दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याच प्रकरणात मुंबईमधून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्वजण कुख्यात डॉन दाऊदचे हस्तक असल्याचे समोर आले आहे. मुंबईत झालेल्या १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर तब्बल सुमारे २८ वर्षांनी दाऊदचे नाव पुन्हा समोर आले आहे. दाऊदच्या हस्तकांनी या कालावधीत विविध व्यवसायात आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत. ते स्लीपर सेल म्हणून त्याच्यासाठी काम करत असून वेळ पडल्यावर त्यांचा वापर केला जातो. यामुळे दाऊदचे नेटवर्क मुंबईसह भारतात आधीही होते आणि आताही आहे हे निदर्शनास आले आहे. वेळीच त्याचा बिमोड करण्याची गरज असल्याचे मत वंजारी यांनी व्यक्त केले आहे.

  • स्लीपर सेल म्हणून काम -

मुंबईत १९९३ मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले होते. त्यानंतर कुख्यात डॉन दहशतवादी म्हणून घोषित झाला. त्यानंतर त्याच्या सकृद्दर्शनी ऍक्टिव्हिटीज काही दिसत नाहीत. भारतात दाऊदचे नेटवर्क आहे हे माहीत असल्याने पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तचर संस्था त्याचा वापर करत होती. १९९३ नंतर काही लहानसहान प्रकरणात दाऊदचे नाव समोर आले. मध्यंतरी मुंबईमध्ये गुन्हे असल्याने दाऊदचा लहान भाऊ इस्माईल कासकर पोलिसांना शरण आला. यावरून आजही दाऊदचे नेटवर्क आहे असे म्हणायला पुरेसे कारण आहे. दाऊदचे नेटवर्क स्लीपर सेल म्हणून काम करत आहे. त्यांना एखादे काम असते किंवा आवश्यकता असते तेव्हा या नेटवर्कला ऍक्टिव्ह केले जाते, असे वंजारी यांनी सांगितले.

dawood file photo
दाऊदचा फाईल फोटो
  • अफगाणिस्ताननंतर पाकिस्तान ऍक्टिव्ह -

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा करून सत्ता स्थापन केली आहे. तालिबानच्या सरकार स्थापनेला पाकिस्तानने पाठिंबा दिला आहे. तालिबानच्या कारवायानंतर भारताविरुद्ध आपण काही करायला हवे असे पाकिस्तानला वाटत आहे. त्यासाठी स्लीपर सेल पुन्हा ऍक्टिव्ह केले आहे. त्याच्या माध्यमातून भारतात कारवाया करण्याचा पाकिस्तानचा मानस आहे. हे नुकत्याच पकडण्यात आलेल्या दाऊदच्या हस्तकांच्या माध्यमातून समोर आले आहे. गुप्तचर यंत्रणांनी वेळीच दाऊदच्या हस्तकांना पकडून घातपाताचा प्रकार उधळून लावला आहे, अशी माहिती वंजारी यांनी दिली.

  • २६ / ११ सारखा कट उधळला -

मुंबईसह देशभरात दाऊदच्या हस्तकांना पकडले आहे. यामुळे काही राजकीय पक्ष आपल्या गुप्तचर संस्था काय करत होत्या? असे प्रश्न उपस्थित करत आहेत. गुप्तचर यंत्रणा झोपल्या होत्या का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आपल्या गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणा जर कार्यरत नसत्या तर दाऊदच्या हस्तकांवर कारवाई झालीच नसती. गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांवर चुकीची टिकाटिप्पणी करणे कायद्याने गुन्हा आहे. आपल्या सुरक्षा यंत्रणा आधी सत्यता तपासतात नंतर कार्यवाही करतात. या सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणा आहेत म्हणून आपण घरात चांगली झोप घेऊ शकतो. २६ / ११ सारखा दहशतवादी हल्ला त्यापेक्षा मोठा हल्ला झाला असता. त्याची किंमत आपल्याला चुकवावी लागली असती. त्याआधीच २४ तास काम करणाऱ्या गुप्तचर संस्था आणि सुरक्षा यंत्रणांनी दाऊदच्या हस्तकांना पकडले आहे. त्यांचे कौतुक करायला पाहिजे, असे वंजारी म्हणाले.

  • यामधून मिळतो दाऊद गॅंगला पैसा -

१९९३ नंतर दहशतवादी म्हणून दाऊदचे नाव पुढे आल्यावर त्याचे हस्तक इतर व्यवसायात काम करू लागले. बिल्डर, अमली पदार्थ, खंडणी अशा प्रकारात त्यांनी आपले बस्तान बसवले आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये खंडणी वसुली तसेच अमली पदार्थ पुरवणे यामध्ये दाऊदच्या हस्तकांची नावे आली आहेत. यामधून मिळणारा पैसा तसेच आंतरराष्ट्रीय स्थरावरून मिळणारा पैसा यातून दाऊदच्या गॅंगचे काम चालते. गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा मिळून त्यांच्यावर कारवाई करतील, असे वंजारी म्हणाले.

हेही वाचा - अखेर राज कुंद्राला जामीन मंजूर, अडीच महिन्यानंतर घेणार मोकळा श्वास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.