ETV Bharat / city

डॉ आंबेडकरांचे विविध पैलू जगासमोर आणण्यासाठी वेगळी यंत्रणा ऊभी राहिली पाहिजे - अविनाश महातेकर - अविनाश महातेकर

आंबेडकरांसारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे विविध पैलू प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने पुढाकार घेऊन पुस्तकांच्या पलीकडे जाऊन एक वेगळी यंत्रणा त्यांचे विचार पोहचवण्यासाठी उभी केली पाहिजे. चित्रफितीच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार लोकांसमोर घेऊन आले पाहिजे. तसेच आंबेडकरी अनुयायांनी देखील बाबासाहेबांच्या विविध पैलूचा प्रसार केला पाहिजे असे मत आंबेडकरी नेते अविनाश महातेकर यांनी इटीव्ही भारताशी बोलताना मांडले.

dd
डॉ आंबेडकरांचे विविध पैलू जगासमोर आणण्यासाठी वेगळी यंत्रणा ऊभी राहिली पाहिजे - अविनाश महातेकर
author img

By

Published : Dec 6, 2020, 6:49 AM IST

Updated : Dec 6, 2020, 7:03 AM IST

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटनाकार, कायदे पंडित म्हणून जगाला परिचित आहे. मात्र बाबासाहेबांच्या अनेक पैलू युवा पिढीसमोर येणे गरजेचे आहे. बाबासाहेबांचे कार्य हे आधुनिक भारताच्या निर्मितीचे आहे. त्यांचे योगदान हे भारतातील प्रत्येक क्षेत्रात आहे. विशिष्ट जातीसाठी नाही तर प्रत्येक समाज घटकांसाठी राहिलेलं आहे. त्यांच्या कार्यामागे एकच महत्वाचा उद्देश राहिलेला आहे. तो म्हणजे देशातील जाती व्यवस्था संपुष्टात आणणे. आंबेडकरांसारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे विविध पैलू प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने पुढाकार घेऊन पुस्तकांच्या पलीकडे जाऊन एक वेगळी यंत्रणा त्यांचे विचार पोहचवण्यासाठी उभी केली पाहिजे. चित्रफितीच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार लोकांसमोर घेऊन आले पाहिजे. तसेच आंबेडकरी अनुयायांनी देखील बाबासाहेबांच्या विविध पैलूचा प्रसार केला पाहिजे असे मत आंबेडकरी नेते अविनाश महातेकर यांनी इटीव्ही भारताशी बोलताना मांडले.

डॉ आंबेडकरांचे विविध पैलू जगासमोर आणण्यासाठी वेगळी यंत्रणा ऊभी राहिली पाहिजे - अविनाश महातेकर

समता, स्वातंत्र्य, बंधुत्व एक नवी संस्कृती

बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांना मानाचा मुजरा करतो. आज 64 वर्षे बाबासाहेबांना जाऊन झाली आहेत. बाबासाहेबांच्या हयातीमध्ये बाबासाहेबांनी जे काम उभे केले, अगदी तळागाळातल्या माणसाच्या विकासाच्या कामापासून त्याच्या उत्थानाच्या कामापर्यंत आहे. देशामध्ये शेकडो संस्थानं होती आणि वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या विभागात असा विभागलेला असून त्याला एका सूत्रामध्ये बांधायचे काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. देशाची घटना बाबासाहेबांनी लिहिली आहे. त्याचं कौतुक साऱ्या जगामध्ये होत आहे. एकमेव भारत देश असा आहे इतक्या विसंगती पूर्ण लोकांचा वावर असताना या सर्वांना एका सूत्रांमध्ये बांधून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व यावरती आधारित अशा प्रकारची एक नवी संस्कृती निर्माण करायचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं.

विचारांचा प्रसार हे अनुयायांचे काम

आंबेडकरी अनुयायांची एक जबाबदारी आहे की, अनुयायांनी बाबासाहेब आंबेडकर यांची मांडणी करत असताना केवळ आपण त्यांना देवतुल्य मानतो या भूमिकेत न राहता त्यांचे वेगवेगळे पैलू देशासमोर आणले पाहिजे. बाबासाहेब एकाच वेळेला जसे समाजाचा विचार करत होते सामाजिक संस्कृतीचा विचार करत होते. त्याच प्रमाणे बाबासाहेब देशाच्या अर्थशास्त्राचा विचार करत होते. शेतीविषयक त्याचा अभ्यास होता. त्याप्रमाणे बाबासाहेब जेव्हा दुसऱ्या देशात अभ्याससाठी तेव्हा तेथील व्यवस्थेचा देखील अभ्यास करत. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या अनुयायांना देखील तुम्ही तुमचा आळस झटकून टाका आणि कष्ट करायची सवय लावून घ्या तुम्ही मेहनत केली तरच तुम्हाला त्या तुमचा आर्थिक स्थर वाढेल आणि आर्थिक तर तुमचा वाढला तरच तुम्हाला समाजात किंमत राहील असेही सांगायचे. बाबासाहेबांचे वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास होता.

नद्याजोड प्रकल्प ही बाबासाहेबांची संकल्पना

देशाचा विचार करीत असताना त्यांनी नद्याजोड प्रकल्प आणला. पहिल्यांदा त्यांनी देशवासीयांना विचार करायची सवय लावून दिली.नद्या वेगळ्या दिशेने वाहत जात आहे आणि अनेक ठिकाणी जगलं दऱ्यातून पाणी वाहून जात आहे. त्या पाण्याचा लोकांना काही उपयोग होत नाही आहे. त्यामुळे नद्यांचा जोड एकमेकांना जोडून त्याचा शेतीसाठी कसा उपयोग करता येईल ही कल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. आता का होईना या कल्पनेचा विचार होऊ लागला आहे. चार पाच वर्षापासून शासन यासाठी प्रयत्न करायला लागले आहे. वेगवेगळ्या देशाचा त्यांचा अभ्यास होता. यामुळे बाबासाहेब हे सर्व करू शकले. बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा त्याचा सर्व बाजूने विचार होणे गरजेचे आहे.

राजकीय पक्ष करतात नुसता नावाचा वापर

अनेक राजकीय पक्ष बाबासाहेब आंबेडकरांना मानत असल्याचे सांगत असतात. त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार देखील ते सांगत असतात. आपल्या जाहीरनाम्यामध्ये बाबासाहेबांच्या स्मारकाचा विषय ते घेत असतात. मात्र हे सर्व असलं तरी मला जाणवत राहतं की, काही पक्षांचा विचार केला तर काही पक्ष बाबासाहेबांच्या नावाचा नाममात्र नावाचा वापर करतात. बाबासाहेबांच्या नावावर असलेल्या मतदारांचा विचार करून काही पक्षांनी बाबासाहेबांच्या नावाचा वापर सुरू केला. आज ना उद्या लोकांसमोर त्यांचा खरा चेहरा येईल असं महातेकर यांनी सांगितले.

कोण आहेत अविनाश महातेकर
आंबेडकरी चळवळीत प्रभावी वक्ते आणि मुद्देसूद मांडणी करणारे जे मोजके लोक आहेत, त्यामध्ये अविनाश महातेकर यांचे नाव आवर्जून घेतले जाते. रामदास आठवले यांनी काँग्रेस आघाडी सोडून महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्यासोबत राहिलेल्या महत्त्वाच्या सहकाऱ्यांमध्ये महातेकर यांचा समावेश होता. पुण्यात बालपण आणि प्रारंभिक शिक्षण झालेले महातेकर पुढे मुंबईत आले आणि मुंबईच त्यांची कर्मभूमी बनली.

Last Updated : Dec 6, 2020, 7:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.