मुंबई - नोकरीसाठी महाराष्ट्रात यायचं, राज्याची नोकरी करतानाच विरोधी पक्षाची चाकरी करायची, अमाप संपत्ती कमवायची आणि शेवटी जाताना महाराष्ट्रालाच बदनाम करून जायचे. अस कसं चालेल? अशी खरमखरीत टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली गोळा करावा, असे आदेश दिल्याची माहिती मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांनी लिहलेल्या एका पत्राच्या माध्यमातून दिली होती. राज्यात यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा उडाला आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी #ParambirExposed या हॅशटॅगखाली केलेल्या ट्वीटमध्ये परमबीर सिंह यांच्या संपत्तीचा लेखाजोगा मांडला आहे.
हेही वाचा- राज्यात कोरोना स्थिती गंभीर.. लॉकडाऊनच्या दृष्टीने नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश