ETV Bharat / city

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हारून खान शिवसेनेत; संजय पाटलांची डोकेदुखी वाढली - Shivasena

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हारून खान यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ईशान्य मुंबईतील उमेदवार संजय पाटलांची डोकेदुखी वाढली आहे. खान यांच्यासह त्यांच्या समर्थकांनीही यावेळी शिवबंधन बांधले.

शिवबंधन बांधताना
author img

By

Published : Apr 20, 2019, 4:59 PM IST

मुंबई - विक्रोळी पार्कसाईट येथील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हारून खान यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी खान यांना शिवबंधन बांधले. खान यांच्या शिवसेना प्रवेशामुळे ईशान्य मुंबईतील उमेदवार संजय पाटलांची डोकेदुखी वाढली आहे.

शिवबंधन बांधताना

हारून खान यांच्या पत्नी ज्योती हारून खान या वॉर्ड क्रमांक 124 येथील राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहेत. ज्योती यांनी सेनेत पक्षप्रवेश केला नसला, तरी अप्रत्यक्षपणे त्यांचा सेनेला पाठिंबा असेल, अशी माहिती सूत्राकडून मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हारून खान यांच्या प्रवेशामुळे ईशान्य मुंबईचे उमेदवार संजय पाटील यांना मोठा फटका बसू शकतो. पार्कसाईट भागात मुस्लीम समाज मोठ्या प्रमाणात आहे. हारून खान यांना मानणारा वर्गही मोठा आहे. यामुळे संजय पाटील यांची डोकेदुखी वाढली आहे. हारून खान यांचे पक्षात काही अलबेल नव्हते. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपप्रवेश केल्याचीही चर्चा होती. मात्र त्यांनी समोर येत भाजपमध्ये प्रवेश केला नसल्याचे सांगितले होते.

ईशान्य मुंबईत भारतीय जनता पक्षाने नगरसेवक मनोज कोटक यांना उमेदवारी दिली आहे. किरीट सोमय्या हे येथील विद्यमान खासदार होते. त्यांनी थेट मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका त्यांना भोवली होती. स्थानिक शिवसैनिकांनी सोमय्या यांना विरोध केला होता. जर सोमय्या यांना उमेदवारी दिली तर मी अपक्ष उमेदवारी दाखल करेन असा इशारा स्थानिक आमदार सुनील राऊत यांनी दिला होता. यानंतर किरीट सोमय्या यांचा पत्ता कट करत कोटक यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे सेनेने कोटक यांना निवडणून येण्यासाठी पूर्ण ताकद लावल्याचे चित्र दिसत आहे.

Intro:मुंबई।

विक्रोळी पार्कसाईट येथील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हारून खान यांनी कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी खान यांना शिवबंधन बांधले.Body:हारून खान यांच्या पत्नी ज्योती हारून खान या वॉर्ड क्रमांक 124 येथे राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहेत. ज्योती यांनी सेनेत पक्षप्रवेश केला नसला तरी अप्रत्यक्षपणे त्यांचा सेनेला पाठींबा असेल अशी माहिती सूत्राकडून मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हारून खान यांच्या प्रवेशामुळे ईशान्य मुंबईचे उमेदवार संजय पाटील यांना मोठा फटका बसू शकतो. पार्कसाईट भागत मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे. हारून खान यांना मानणारा वर्गही मोठा आहे. यामुळे संजय पाटील यांची डोकेदुखी वाढली आहे. हारून खान यांचे पक्षात काही अलबेल नव्हते. काही दिवसापुर्वी त्यांनी भाजपप्रवेश केल्याची ही चर्चा होती. मात्र त्यांनी समोर येत भाजपात पक्षप्रवेश केला नाही असे सांगितले होते. ईशान्य मुंबईत भारतीय जनता पक्षाने नगरसेवक मनोज कोटक यांना उमेदवारी दिली आहे. किरीट सोमय्या हे येथील विद्यमान खासदार होते. त्यांनी थेट मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका त्यांना भोवली होती. स्थानिक शिवसैनिकांनी सोमय्या यांना विरोध केला होता. जर सोमय्या यांना उमेदवारी दिली तर मी अपक्ष उमेदवारी दाखल करेन असा इशारा स्थानिक आमदार सुनील राऊत यांनी दिला होता. यानंतर किरीट सोमय्या यांचा पत्ता कट करत कोटक यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे सेनेने कोटक यांना निवडणून येण्यासाठी पूर्ण ताकद लावल्याचे चित्र दिसत आहे.
Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.