ETV Bharat / city

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मुंबई पालिका आयुक्त कार्यालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न - sucide

मुंबई महापालिकेच्यावतीने सार्वजनिक शौचालय तोडण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या सुदाम शिंदे या कार्यकर्त्यांने आत्मदहणाचा प्रयत्न केला आहे.

पालिका आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
author img

By

Published : Jun 24, 2019, 4:37 PM IST

Updated : Jun 24, 2019, 5:24 PM IST

मुंबई - एकीकडे सरकार स्वच्छतेचे धडे देत आहे, तर दुसरीकडे प्रशासनच सार्वजनिक शौचालये तोडत आहे. घाटकोपर पश्चिम येथील भटवाडीमधील सार्वजनिक शौचालय बिल्डरच्या फायद्यासाठी महापालिकेकडून तोडले जात आहे. यामुळे येथील राहिवाशांना त्रास होणार असल्याने शौचालय तोडू नये, या मागणीसाठी घाटकोपर पश्चिम येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुदाम शिंदे यांनी पालिका आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.

पालिका आयुक्त कार्यालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न

घाटकोपर पश्चिम भटवाडी येथील राम जोशी मार्गावरील माता महाकाली सेवा मंडळ या ठिकाणी सरकारी मालकीचा जागेवर ३८ आसनी शौचालय आहे. त्याचा वापर येथील एक हजार ते दीड हजार नागरिक याचा वापर करतात. या विभागातील नागरिकांना पर्यायी सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठया प्रमाणात गैरसोय होणार आहे. येथील लोकसंख्या पाहता हे शौचालय नागरिकांना अपुरे पडते. या संदर्भात ४ वर्षापासून आमरण उपोषण, धरणे, आंदोलन, मोर्चा या लोकशाही पद्धतीने आंदोलन करूनही महानगरपालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार सुदाम शिंदे यांनी दिली.

महानगरपालिका विभागातील सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे व परिमंडळ - ६ चे उपायुक्त ढाकणे यांच्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करून बिल्डर व अधिकारी यांच्या संगनमताने शौचालय तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यापुर्वी हे शौचालय चांगल्या दर्जाचा असल्याचा अहवाल दिला आहे, मात्र सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे त्या अहवालाकडे दुर्लक्ष करत आहे. सर्व नियमाचे उल्लंघन करत आहे. बिल्डर शौचालय तोडून त्या जागेवर इमारत बांधण्यासाठी मदत करत असल्याचा आरोप सुदाम शिंदे यांनी केला आहे. याबाबत पालिका आयुक्तांपासून राज्यपालांपर्यंत तक्रार केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज शिंदे यांनी मुख्यालयात एका बाटलीमधून रॉकेल आपल्या अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र वेळीच त्याला पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी पकडून आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.

Intro:महापालिकेकडून सार्वजनिक शौचालय तोडल्याने राष्ट्रवादीच्या सुदाम शिंदे या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
- आयुक्त कार्यालयाबाहेर अंगावर रॉकेल ओतून घेताना सुरक्षा रक्षकांनी शिंदे यांना पकडून आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलेBody:फ्लॅशConclusion:
Last Updated : Jun 24, 2019, 5:24 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.