ETV Bharat / city

'फडणवीस आता मुख्यमंत्री नाहीत.. या मनःस्थितीतून ते अजून बाहेर पडत नाहीत' - nawab malik news

राज्यातील जनता दुष्काळामुळे प्रचंड अडचणीत सापडलेली आहे आणि त्यांना मदत मिळावी म्हणून आमचे शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटण्यासाठी जात आहे. यात कुठलाही राजकीय विषय नाही. यात शिवसेना आमच्यासोबत येत असून राज्यातील जनतेसाठी भाजपनेसुद्धा आमच्यासोबत घेऊन राज्यातील जनतेच्या हिताचा विषय मार्गी लावावा, अशी मागणीही त्यांनी केली.

नवाब मलिक - प्रवक्ते, राष्ट्रवादी
author img

By

Published : Nov 16, 2019, 2:16 PM IST

मुंबई - देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदासाठी तर रोज स्वप्न पाहतात. परंतु, आता ते पूर्ण होत नाही, म्हणून रोज सकाळी उठून ते मीच मुख्यमंत्री होईल, असे सांगत आहेत. त्यामुळे ते आता मुख्यमंत्री नाहीत या मनःस्थितीतून बाहेर पडत नाहीत, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्यांना या मनःस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणखी वेळ लागेल आणि त्यानंतर त्यांना कळेल, अशी टीकाही मलिक यांनी केली.

नवाब मलिक - प्रवक्ते, राष्ट्रवादी

हेही वाचा - प्रिन्स प्रकरण: महापालिका सभागृहात थर्ड पार्टी चौकशीची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे विधान भाजप नेत्यांसह देवेंद्र फडणवीस हेही करत असून राज्यात भाजपचे सरकार येईल, असा दावा करत आहेत. यावर मलिक यांना विचारले असता ते म्हणाले की, भाजपमध्ये सत्तेसाठी जे लोक सामील झालेले आहेत त्यांना आताही भाजपची सत्ता येणार नसल्याचे लक्षात आल्याने ते आपल्याकडून पळून जातील ही भीती भाजपला सतावत आहे. म्हणून त्यांना रोखून धरण्यासाठी राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येईल, असे सांगावे लागत आहे, अशी खोचक टीकाही मलिक यांनी केली.

हेही वाचा -'संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील हिरा'

भाजपकडे असलेले 105 चे संख्याबळ आणि त्यांच्या नेत्यांकडून करण्यात येत असलेला 119 चा दावा यावर सरकार बनत नाही. परंतु, कर्नाटकप्रमाणे येथे काही करता येईल, असे त्यांना वाटत असले तरी येथे असा प्रकार होऊ शकत नाही हे लक्षात आले आहे. म्हणूनच आपल्याकडून लोक निघून जातील आणि त्यांना थांबवण्यासाठी सरकार आपलेच येईल असा दावा ते करत आहेत, असेही मलिक म्हणाले.

राज्यातील जनता दुष्काळामुळे प्रचंड अडचणीत सापडलेली आहे आणि त्यांना मदत मिळावी म्हणून आमचे शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटण्यासाठी जात आहे. यात कुठलाही राजकीय विषय नाही. यात शिवसेना आमच्यासोबत येत असून राज्यातील जनतेसाठी भाजपनेसुद्धा आमच्यासोबत घेऊन राज्यातील जनतेच्या हिताचा विषय मार्गी लावावा, अशी मागणीही त्यांनी केली. तर, दिल्ली येथे मंगळवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट होणार असून त्यानंतर पुढील निर्णय होणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट केव्हा होईल हे मात्र अद्याप निश्चित झाले नसल्याचेही मलिक यांनी स्पष्ट केले.

Intro:

...ते मुख्यमंत्री नाहीत या मनःस्थितीतुन अजून बाहेर पडत नाहीत - नवाब मलिक यांचा फडणवीसवर निशाणा
mh-mum-01-ncp-navabmalik-121-7201153

मुंबई, ता. 15 :

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदासाठी तर रोज स्वप्न पाहतात. परंतु आता ते पूर्ण होत नाही म्हणून रोज सकाळी उठून ते मीच मुख्यमंत्री होईल असे सांगत आहेत. त्यामुळे ते आता मुख्यमंत्री नाहीत या मनःस्थितीतुन मधून बाहेर पडत नाहीत, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.त्यांना या मनःस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी आणखी वेळ लागेल आणि त्यानंतर त्यांना कळेल, अशी टीकाही मलिक यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे विधान भाजप नेत्यासह ते देवेंद्र फडणवीस हेही करत असून राज्यात भाजपचे सरकार येईल, असा दावा करत आहेत यावर मलिक यांना विचारले असता ते म्हणाले की,भाजपमध्ये सत्तेसाठी जे लोक सामील झालेले आहेत त्यांना आताही भाजपची सत्ता येणार नसल्याचे लक्षात आल्याने ते आपल्याकडून पळून जातील हे भीती भाजपाला सतावत आहे. म्हणून त्यांना रोखून धरण्यासाठी राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येईल, असे सांगावे लागत आहे, अशी खोचक टीका ही मलिक यांनी केली.
भाजपकडे असलेले 105 चे संख्याबळ आणि त्यांच्या नेत्यांकडून करण्यात येत असलेला 119 चा दावा यावर सरकार बनत नाही. परंतु कर्नाटकप्रमाणे येथे काही करता येईल, असे त्यांना वाटत असले तरी येथे असा प्रकार होऊ शकत नाही हे लक्षात आले आहे. म्हणूनच आपल्याकडून निघून लोक निघून जातील आणि त्यांना थांबवण्यासाठी सरकार आपलेच येईल असा दावा करत आहेत असेही मलिक म्हणाले.
राज्यातील जनता दुष्काळामुळे प्रचंड अडचणीत सापडलेली आहे आणि त्यांना मदत मिळावी म्हणून आमचे शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटण्यासाठी जात आहे. यात कुठलाही राजकीय विषय नाही यात शिवसेना आमच्यासोबत येत असून राज्यातील जनतेसाठी भाजपाने सुद्धा आमच्या सोबत घेऊन राज्यातील जनतेच्या हिताचा विषय मार्गी लावावा अशी मागणीही त्यांनी केली. तर दिल्ली येथे मंगळवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट होणार असून त्यानंतर पुढील निर्णय होणार आहेत. तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट केव्हा होईल हे मात्र अद्याप निश्चित झाले नसल्याचेही मलिक यांनी स्पष्ट केले

Body:...ते मुख्यमंत्री नाहीत या मनःस्थितीतुन अजून बाहेर पडत नाहीत - नवाब मलिक यांचा फडणवीसवर निशाणा

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.