मुंबई - उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी ( Uttar Pradesh Election 2022 ) राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची बोलणी ( Ncp Samajwadi Party Alliance ) जवळजवळ पूर्ण झाली आहे. आता उत्तर प्रदेशामधील अन्य लहान पक्षांसोबत समाजवादी पार्टीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव ( Uttar Pradesh Election Akhilesh Yadav ) चर्चा करत आहे. त्यानंतर युतीबाबत घोषणा करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab Malik On Up Election 2022 ) यांनी दिली.
नबाव मलिक बोलताना म्हणाले की, 'उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्षाची जवळजवळ ( Up Election Ncp Samajwadi Party Alliance ) युतीबाबत बोलणी पूर्ण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल ( Ncp Praful Patel ) आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यात ही बोलणी सुरु आहे. उत्तर प्रदेशामधील अन्य लहान पक्षांसोबत अखिलेश यादव चर्चा करत आहे. ही बोलणी झाल्यानंतर युतीबाबत घोषणा करण्यात येईल.'
पंतप्रधानाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर भाष्य करणं चुकीचे
'पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत चूक घडली होती का? याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी सुरु आहे. मात्र, याप्रकरणात भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष जे पी नड्डा काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी करत असतील तर ते चुकीचे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीअंती पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत चूक झाली होती का ? किंवा या प्रकरणामध्ये केवळ राजकारण केले जाते, हे समोर येईल,' असे मत नवाब मलिक ( Nawab Malik On Pm Security Breach ) यांनी व्यक्त केले आहे.
उत्तर प्रदेशात परिवर्तन
मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar On Up Election 2022 ) म्हणाले की, 'उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन होणार आहे. कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्या यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी समाजवादी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच, त्यांच्यासोबत 13 आमदार आणि अन्य काही नेते देखील सपात प्रवेश करतील. मौर्या यांचा राजीनामा ही तर सुरुवात आहे. पुढच्या काही दिवसांत दररोज कोणता ना कोणता नवा चेहरा राजीनामा देऊन इकडे येईल आणि परिवर्तनाच्या प्रक्रियेत सहभागी होईल,' असेही पवार यांनी सांगितले.