मुंबई - आयआयटी मुंबईने 45 टक्के शुल्कवाढ केली आहे. ती शुक्लवाढ मागे घेण्यासाठी आयआयटी मुंबईच्या आवारामध्येच विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. आयआयटी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांना आयआयटी प्रशासन कोणताही प्रतिसाद देत नाही, हे पाहून विविध विद्यार्थी संघटनांनी कालपासूनच आयआयटी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे .त्याअनुषंगाने राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांचे नेते अमोल मातेले यांच्या नेतृत्वात रविवारी ( 7 जुलै ) दुपारी आयआयटी मुंबईच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. तसेच फी वाढ रद्द करावी, अशी मागणी करण्यात ( NCP Protest Against IIT ) आली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस वतीने ,'पोलीस तेरी दादागिरी नही चलेगी' आणि आयटीच्या प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत आयटीच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत मध्ये जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलीस यंत्रणांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि नेत्यांना मुख्य प्रवेशद्वारावरच अडवलं आणि त्यांना ताब्यात घेतलं.
आयआयटी वतीने सर्व शुल्कवाढ केली आहे. मागील वर्षापर्यंत एमटेक अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क 19 हजार होते. ते आता तब्बल 51 हजार 450 रुपयापर्यंत पोहोचले आहे. तर, प्रत्येक सहा महिन्यासाठी अर्थात सेमिस्टरसाठी विद्यार्थ्यांकडून 16 हजार 500 रुपये शैक्षणिक शुल्क आकारले जात होते. आता त्यात वाढ होऊन 23 हजार 950 रुपये ऐवढे झालेले आहे. त्यासोबतच वस्तीगृहाची देखील शुल्क वाढ करण्यात आली आहे. जिमखानाच्या संदर्भात देखील दोन हजार रुपये सेमिस्टर शुल्क वाढ करण्यात आली आहे. खानावळीच्या संदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढ केल्यामुळे सर्व प्रवर्गातील विद्यार्थी एकजुटीने आयआयटी प्रशासनाच्या विरोधात आवारातचा गेले दोन आठवडे आंदोलन करत आहेत.
"प्रशासनाच्या या आठमुठे धोरणामुळेच विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाहीय. त्यापार्श्वभूमीवर विविध विद्यार्थी संघटनांनी आणि युवक संघटनांनी आयटीच्या विद्यार्थ्यांच्या न्याय आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांच्यासोबत उभे राहत राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबई वतीने आम्ही हा इशारा दिला आहे की, जर आयआयटी प्रशासनाने ही वाट रद्द केली नाही. यापुढे अधिक उग्र आंदोलन करू," असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले आहे.
हेही वाचा - Ajit Pawar : 'वरिष्ठांना खुश करण्यासाठी तशी वक्तव्य केली जातात'; राज्यपालांना अजित पवारांचा टोला