मुंबई - आपल्या प्रश्नांवर चर्चा व्हावी यासाठी अधिवेशनात विरोधी पक्षाचे खासदार वेलमध्ये उतरले होते. मात्र केंद्र सरकारने मार्शल बोलून खासदारांना धक्काबुक्की केली. यात महिला खासदारांना धक्काबुक्की झाली. संसदेच्या इतिहासात महिला खासदारांना अशी धक्काबुक्की कधीही झाली नसल्याचे शरद पवार यांनी म्हणत केंद्र सरकारवर टीका केली.
नुकत्याच पार पडलेले संसदीय अधिवेशन हे वादळी ठरले. अनेक मुद्यावरून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांचा या अधिवेशनात राहिला तर संसदेचं कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न या अधिवेशनात केंद्र सरकारकडून केला गेला. मात्र विमा विधेयकावर चर्चा करावी, अशी मागणी विरोधकांकडून जोर धरत होती. यासाठी काही विरोधी पक्षाचे खासदार लोकसभा अध्यक्षांच्या वेलमध्ये उतरले. यावेळी सरकारकडून मार्शल बोलून महिला खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत केलेल्या पत्रकार परिषदेतून केला आहे.
तो सदस्यांवरील हल्लाच होता.. संसदेच्या इतिहासात महिला खासदारांना पहिल्यांदाच धक्काबुक्की - संसदेत महिला खासदारांना धक्काबुक्की
राज्यसभेत झालेल्या गोंधळाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. सभागृहात घुसलेल्या मार्शलनी महिलांना धक्काबुक्की केली. तसेच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना अक्षरश: उचलले होते. यापूर्वी मी असा प्रकार कधीच पाहिला नव्हता. राज्यसभेत त्या दिवशी घडलेला हा प्रकार म्हणजे संसद सदस्यांवरील हल्लाच होता, असे घणाघात शरद पवार यांनी केला आहे.