मुंबई : राज्यातील राजकीय परिस्थिती ( Politics In Maharashtra ) पाहता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व मंत्री आणि पक्षाच्या नेत्यांची बैठक आयोजित केली ( Sharad Pawar Called Meeting ) आहे. राज्यातील राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा बैठकीत घेण्यात येणार ( Ministers Performance Review ) आहे. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ( Yashwantrao Chavhan Pratishthan Mumbai ) सकाळी दहा वाजता ही बैठक होईल.
राजकीय घडामोडींवर चर्चा
शरद पवार यांनी बोलावलेल्या या बैठकीत राज्यातील राजकारणावर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. गेल्या महिनाभरात राज्यात घडत असलेल्या राजकीय बाबींवर बैठकीत चर्चा होऊ शकते. तसेच राज्यातील राजकारणावर राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका ठरवण्यात येऊन त्याची माहिती सर्व मंत्री आणि नेत्यांना दिली जाऊ शकते.
कोरोनाच्या परिस्थितीचाही आढावा
राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत ( Covid In Maharashtra ) आहे. अशा परिस्थितीत कोरोना कमी होण्याच्या दृष्ठीने काय केले जाऊ शकते यावरही शरद पवार हे सर्व मंत्री आणि आमदारांचे मत जाणून घेण्यात येणार असल्याचे समजते.