मुंबई - राज्यपाल नियुक्त 12 नामनिर्देशित सदस्यांबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला आहे. शहाण्याला शब्दाचा मार, पण शहाण्याला.. म्हणत शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना 12 सदस्यांच्या नियुक्तीबाबत टोला लगावला आहे. मुंबईत शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा टोला राज्यपालांना लगावला.
12 राज्यपाल नामनिर्देशित सदस्य यांच्या नियुक्तीबाबत आठ महिन्यानंतरही प्रलंबित आहे. सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानिमित्त राज्यपाल पुण्यामध्ये होते. यावेळी काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांनी कार्यक्रमादरम्यान राज्यपालांना प्रलंबित 12 आमदारांच्या मुद्द्याबाबत छेडले असता 'राज्य सरकार काही विचारत नाही, मग तुम्ही का विचारता' असा उलट प्रश्न राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शरद रणपिसे यांना केला होता. याबाबत सांगताना शरद पवार म्हणाले की, प्रलंबित 12 आमदारांच्या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना या प्रश्नाबाबत पत्र लिहिलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देखील याबाबत राजभवनवर जाऊन राज्यपालांना पत्र दिले होते. मात्र तरीही राज्यपाल असे बोलत आहेत. त्यामुळे शहाण्याला शब्दाचा मार, पण शहाण्याला.. असे म्हणत शरद पवारांनी राज्यपालांना टोला लगावला आहे. त्यासोबतच राज्यपालांच्या वाढत्या वयामुळे त्यांना पत्र वाचता आलं नसावे, असा चिमटाही शरद पवार यांनी काढला.
शहाण्याला शब्दाचा मार.. पत्र गेलं आहे मात्र वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आले नसेल, पवारांचा राज्यपालांना टोला - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी आणि राज्यपालांचा संघर्ष अद्यापही सुरुच आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरुन जोरदार टोला हाणला आहे.