ETV Bharat / city

विकास कामांचे मुद्दे नसल्याने भाजपकडून कलम 370 चा वापर - नवाब मलिक - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

राज्यातील भाजप सरकार हे विकासाच्या आघाडीवर कमी पडल्यामुळेच कलम 370 मुद्द्याचा वापर प्रचारासाठी केला जातोय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची सरकारवर टीका...

नवाब मलिक
author img

By

Published : Sep 23, 2019, 5:13 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, रंगस्वर हॉल येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पक्षाच्या वतीने निवडणुकांबाबत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच अनेक मुद्द्यांवर भाजप सरकारवर सडकून टीका केली.

हेही वाचा... गुहागर विधानसभा मतदारसंघ : शिवसेना-भाजपच्या कुरघोडीत यंदाही होणार तिसऱ्याचाच लाभ?

नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे ;

  • कलम ३७० च्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा

अमित शाह यांनी काल सभेत आमच्यावर काही प्रश्न उपस्थित केले, मात्र ते ३७० बाबतीत भाजप माध्यमातून दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री हे ३७० वरून केंद्राचे अभिनंदन करत आहेत. मग वर्षभरापूर्वी काश्मीरमध्ये कोणाचे सरकार चालवत होता? हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे, असे मलिक यावेळी म्हणाले.

काश्मीरमधील ३७० कलम हटवण्यापूर्वी तेथील लोकांना विश्वासात घेणे गरजेचे होते. ३७० कलम रद्द झाल्याने तेथील जमिनी मोठ्या उद्योजकांसाठी आंदण ठरणार आहे. पर्यटनाच्या नावाखाली अदानी, अंबानी या बड्या उद्योजकांच्या घशात या जमिनी घालण्याचे सरकार कारस्थान करत आहे, असाही आरोप मलिक यांनी केला.

  • पहिल्यांदा काश्मीरमध्ये भारताचा झेंडा हा पहिल्यापासून फडकावला जातो

काश्मीरमध्ये मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदाच तिरंगा फडकला असा खोटा दावा अमित शाह करत आहेत. ते देशातील नागरिकांची दिशाभूल करत देशातील एकोप्याला धक्का देत आहेत. काश्मीरच्या वेगळ्या झेंड्याला तुम्ही विरोध करता मग नागालँडमध्ये वेगळ्या झेंड्यास परवानगी का देता? असा प्रश्न मलिक यांनी यावेळी उपस्थित केला

  • शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महान विचारांनीच आदरणीय @PawarSpeaks साहेब राजकारण करत आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकारणाची पाळेमुळे मजबूत आहेत. परंतु गोळवलकर गुरुजींच्या विचारांचे राजकारण किती काळ टिकेल? याबाबत आम्हाला शंका आहे. येणाऱ्या काळात ते चित्र स्पष्ट होईलच. #Pressconference pic.twitter.com/6E0YQXPp4t

    — Nawab Malik (@nawabmalikncp) September 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

  • भाजप सरकार विकासाच्या आघाडीवर अपयशी ठरले

राज्याच्या निवडणुकीत भाजपला दाखवण्यासाठी काही नाही म्हणून ते ३७० घेऊन समोर येत आहेत. त्यांनी एक तरी मेघा प्रकल्प दाखवावा, मेट्रोच्या कामाची मान्यता भूमिपूजन हे आघाडीच्या काळात झाले आहेत. याउलट या सरकारच्या काळात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, पूरग्रस्तांना मदत मिळाली नाही. बेरोजगार यावर हे सरकार काही करत नाही, लोकांचे रोजगार जात आहेत, यावर हे काही करत नाहीत. यामुळे जनतेत चीड आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली.

हेही वाचा... भाजप घटक पक्षांना विचारात घेत नाही, विनायक मेटेंचा आरोप​​​​​​​

  • राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस संयुक्तरित्या जाहीरनामा सादर करणार

आज पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीतर्फे स्वतंत्र जाहीरनामा प्रकाशित केला जाणार होता, पण तसे करण्यात आले नाही. याबद्दल बोलताना मलिक यांनी, समृद्ध महाराष्ट्रासाठीचा, राज्यातील जनतेच्या सर्व प्रश्नांवर भाष्य करणारा संयुक्त जाहीरनामा लवकरच प्रकाशित करू, असे सांगितले. 'आमचे काँग्रेससोबत बोलणे झाले आहे. आम्ही एकत्र निवडणूक लढवत आहोत. आम्ही जाहीरनामा हा संयुक्त काढणार आहोत. आज आमचा जाहीरनामा तयार होता, परंतु राज्यात आम्हाला आघाडीचे आमचे प्रमुख घटक असलेल्या काँग्रेसने आम्हाला विनंती केल्याने आम्ही ते ऐकले आणि आम्ही आता दोन्ही पक्ष मिळून संयुक्त जाहीरनामा काढणार आहोत.' असे मलिक यांनी सांगितले आहे.

आघाडीचा बैठकीत आम्ही १२५ , आणि १२५ जागांचे निश्चित झाले आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाबाबत मित्रपक्षांशी आमची बोलणी सुरू आहे. लवकरच त्याबाबतीत निर्णय घेतला जाईल. शेकाप, बहुजन विकास आघाडी, कवाडे साहेब आमच्या सोबत आहेत. आणखी अनेक समविचारी पक्ष सोबत यायला तयार आहे. शेकाप, सोबत आहे, समाजवादी सोबत बोलणे सुरू आहे, बहुजन विकास आघाडी आमच्यासोबत येण्यासाठी तयार आहे., याबद्दल चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल., असे मलिक यांनी सांगितले.

ncp nawab malik press conference
नवाब मलिक यांची मुंबई येथे पत्रकार परिषद
  • प्रकाश आंबेडकरांवर टीका

आंबेडकरांनी जनतेला स्वप्ने दाखवली. परंतु जनतेला आता कळले आहे की, मत विभाजनाचा फायदा हा सेना भाजपला होत आहे, यामुळे आगामी विधानसभेला जनता आम्हालाच मतदान करेल, असे मलिक यावेळी म्हणाले. तसेच मतदान आणि निकालानंतर आम्ही आमचा मुख्यमंत्री जाहीर करू, असेही भाष्य त्यांनी केले आहे.

  • मनसेला मित्रपक्षांचा विरोध

मनसे मागील वेळी आमच्यासोबत नव्हती. त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात लोकसभेच्या वेळी प्रचार केला. यावेळी ते आमच्यासोबत नाहीत. या आघाडीत काही घटक पक्षांनी मनसेसाठी विरोध केल्याने त्यावर निर्णय झाला आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

  • पवार साहेबांची राजकारणातील पाळेमुळे भक्कम

शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महान विचारांनीच शरद पवार राजकारण करत आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकारणाची पाळेमुळे मजबूत आहेत. परंतु गोळवलकर गुरुजींच्या विचारांचे राजकारण किती काळ टिकेल? याबाबत आम्हाला शंका आहे. येणाऱ्या काळात ते चित्र स्पष्ट होईलच, असे त्यांनी यावेळी म्हटले.

हेही वाचा... विधानसभेच्या रणांगणात धडाडणार 'या' शिव व्याख्यात्यांच्या 'तोफा'!

Intro:
नवाब मलिक पत्रकार परिषद
मुद्दे.....

अमित शहा यांनी काल आमच्यावर काही प्रश्न उपस्थित केले, मात्र ते ३७० बाबतीत भाजप माध्यमातून दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे.

मुख्यमं त्री हे ३७० वरून केंद्राचे
अभिनंदन करत आहेत, मग वर्षेभरा पूर्वी काश्मीरमध्ये कोणाचे सरकार चालवत होता,? लढाखचे खासदार कोणत्या देशाचे होते, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे...

पहिल्यांदा काश्मीरमध्ये भारताचा झेंडा हा पहिल्यापासून फडकावला जातो,

१९९७ पर्यंत आरएसएसच्य मुख्यालयावर झेंडा फडकावला नाही, तर आम्ही फडकावू असे सांगितल्यावर त्यांनी तो फडकावला
काश्मीरमध्ये

७० दिवस संचारबंदी का लागली ते सांगत नाहीत....
काश्मीरमध्ये
पण काही मूठभर लोकांचे वेगळे म्हणणे आहे, परंतु बहुसंख्य लोक भारतासोबत राहणारे आहेत

लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायला हवा होता.परंतु भाजपचे लोक ज्या प्रकारे प्रचार करत आहेत, ते चुकीच्या

पर्यटकांच्या नावाने गुलमर्ग, सोन्मर्ग येथे असलेल्या जागा या आदानी आंबनी यांनाा देण्यासाठी सरकारने हा कोणालाही विश्वासात न घेता हा निर्णय घेतला आहे...

नागालँडमध्ये वेगळ्या झेंडा का दिला जातो, याची माहिती का दिली जात नाही, भाजप चुकीची माहिती देऊन ते आम्हाला बदनाम करताना दिसताहेत...
राज्याच्या निवडणुकीत भाजपाला दाखवण्यासाठी काही नाही म्हणून ते ३७० घेऊन समोर येत आहेत

त्यांनी एक तरी मेघा प्रकल्प दाखवावा, मेट्रोच्या कामाची मान्यता भूमिपूजन हे आघाडीच्या काळात झाले आहेत...
हे सरकार आघाडीवर अप्यशी ठरले आहे
१६ हजार शेतकरी आत्महत्या केली, पूरग्रस्तांना मदत मिळाली नाही

बेरोजगार यावर हे सरकार काही करत नाही..लोकांचे रोजगार जात आहेत, त्यावर हे काही करत नाहीत...यामुळे जनतेत चीड आहे, परंतु

साताऱ्यात जनतेचा पाठिंबा मिळालेला आहे.. आम्हाला पूर्ण खात्री आहे, आमचा कार्यकर्ता ताकदीने उभा आहे, जनता

आमचे काँग्रेससोबत बोलणे झाले आहे,आम्ही एकत्र निवडणूक लढवत आहोत.. आम्ही जाहीरनामा हा संयुक्त काढणार आहोत.. आज आमचा जाहीरनामा तयार होता, परंतु राज्यात आम्हाला आघाडीचे आमचे प्रमुख घटक असलेल्या काँग्रेसने आम्हाला विनंती केल्याने आम्ही ते ऐकले....आणि आम्ही आता दोन्ही पक्ष मिळून संयुक्त जाहीरनामा काढणार आहोत..

आघाडीचा बैठकीत आम्ही १२५ , आणि १२५ जागांचे निश्चित झाले आहे, शेकाप, सोबत आहे, समाजवादी सोबत बोलणे सुरू आहे, बहुजन विकास आघाडी आमच्यासोबत येण्यासाठी तयार आहे...

आंबेडकरी जनतेला स्वप्नं दाखवली आहेत, परंतु आंबेडकरी जनतेला आता कळले आहे, मत विभाजनाचा फायदा हा सेना भाजप ला होत आहे,

मतदान आणि निकालानंतर आम्ही आमचा मुख्यमंत्री जाहीर करू..

मनसे मागील वेळी आमच्यासोबत नव्हती...त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात लोकसभेच्या वेळी प्रचार केला...यावेळी ते आमच्यासोबत नाहीत.. या आघाडीत काही घटक पक्षांनी मनसे साठी विरोध केल्याने त्यावर निर्णय झाला आहे...

पवार यांची राजनीती ही शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांची आहे, ती या देशात चिरंतन राहील, मात्र गोळवलकर यांची परंपरा टिकणारी नाही...

भाजपचे ब्रिजभूषण हे खासदार दाऊदच्या जवळचे आहेत...आहे भाजपामध्ये अनेक लोक त्यांच्या जवळचे आहेत...
मुंबईत जेजे हत्याकांड झाले होते ते आरोपी होते, त्यांच्या आईटी सेलमधील लोक वारंवार अटक होतात, त्यामुळे त्यांच्याकडे अधिक लोक आहेत...

Body:नवाब मलिक पत्रकार परिषद
मुद्दे.....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.