ETV Bharat / city

पाच वर्षात मुंबईतील आमदाराने कोणते विकास कामे केले यांचा भांडाफोड करू - नवाब मलिक

मुंबईत असंख्य प्रश्न आहेत. त्यासाठीचे कार्यक्रम तयार करुन आम्हाला मुंबईचा आवाज बनण्याचे काम करायचे आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केले.

नवाब मलिक
author img

By

Published : Aug 9, 2019, 11:14 AM IST

मुंबई - आमचा पक्ष कमकुवत आहे, याची मला जाणीव आहे. मुंबईत ज्यांचा आवाज नाही, त्यांचा आवाज आम्हाला बनायचं आहे. म्हणूनच आम्ही मागील ५ वर्षात मुंबईतील आमदारांनी कोण कोणती विकास कमी केली, याचा भांडाफोड करुन आम्ही मुंबईकरांसमोर जाणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

मुंबईतील विविध प्रश्नावर बातचित करताना नवाब मलिक

मागील २० वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत ताकत ही मर्यादित राहिली आहे. मुंबईत सुरुवातीला आमचा १ आमदार होता. नंतर त्याचे ३ होऊन पुन्हा आम्ही १ वर आलो. मागील निवडणुकीत आमचा एकही आमदार मुंबईतस निवडून आला नाही. यादरम्यान, मुंबईत आम्हाला १४ पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणता आले नाही. त्यामुळे आम्हाला आमची कमतरता माहीत आहे. तरीसुद्धा २ महिन्यात येत असलेल्या विधानसभा निवडणुकीत कमीत कमी ४ आमदार निवडून आणू, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आम्ही त्यावर फोकस करणार आहोत, असेही ते म्हणाले.

मुंबईत असंख्य प्रश्न आहेत. त्यासाठीचे कार्यक्रम तयार करुन मुंबईतील कामगार, महिला, चाळीतील रहिवासी आणि व्यापारी नोकरदार त्याच्या प्रश्नाला आम्ही वाचा फोडण्याचे काम करणार असून त्यातूनच आम्हाला मुंबईचा आवाज बनण्याचे काम करायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष लोकांचा आहे, लोकांचा आवाज आहे. तो आवाज मला बनायचे आहे. मुंबईतील आमदार नेते हे लोकांमध्ये जात नसल्याने त्यांच्या प्रश्नाला वाचा फुटत नाही. त्यामुळे मुंबईसाठी कोणी लढतोय, हा विश्वास वाटल्यास लोक आपोआपच आपल्या सोबत येतील, असा मला विश्‍वास असल्याचे मलिक म्हणाले.

मुंबईत सर्वात मोठा प्रश्न हा त्यांच्या घरांचा आणि पुनर्विकासाचा आहे. या सरकारने २०२२ पर्यंत सगळ्यांना घरे देऊ असे आश्वासन दिले, मात्र, मागील ५ वर्षात मुंबईतील तब्बल २ लाख लोकांना बेघर करण्याचे काम सरकारने केले. एकीकडे सर्वांना घरे देण्याची घोषणा करायची आणि दुसरीकडे पात्र आणि अपात्र भानगडी करुन लोकांना रस्त्यावर आणण्याचे काम सरकार करत आहे. त्यामुळे ही मंडळी बोलतात एक आणि करतात एक, म्हणूनच मुंबईतील घरांच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर आहे. इमारत पडल्यावरही त्यासाठी पुनर्विकासासाठी मंजुरी मिळत नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात, की मुंबईतील ४० हजार लोकांच्या घरांचे प्रश्न मी सोडवले. पण मुंबईत ३३ सात नावाचा डीसीआर आणलेला आहे. त्यातील शिफारशीला मंजुरी दिली जात नाही. अजूनही महापालिकेचे आयुक्त यासाठी आम्ही शिफारशी मागून प्रस्ताव तयार करत असल्याचे सांगत असून त्यासाठीच्या सर्व फाईली केवळ पैसे खाण्यासाठी दाबून ठेवलेल्या जात आहेत. मुंबईतील जनता इमारती कोसळून मरत असताना यांना मात्र, आम्हाला मलिदा पाहिजे हा उद्योग सुरू आहे. म्हणून मुंबईत पुनर्विकासाची कामे थांबलेली आहेत. म्हणूनच लोकांना घरे मिळत नाहीत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील मतदार निहाय प्रश्न समजून घेऊन निवडणुकीत ज्या आमदारांनी मागील ५ वर्षात केवळ खंडणी वसूल केली आणि पैसे कमावले, अशा आमदारांच्या विकासकामांचा भांडाफोड करणार आहोत आणि हेच प्रश्न जनतेसमोर घेऊन जाणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.

Intro: पाच वर्षात मुंबईतील आमदाराने कोणते विकास कामे केले यांचा भांडाफोड करू राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्याशी केलेली बातचीत.... मुंबई, ता. 9: मुंबईत आमचा पक्ष कमकुवत आहे, याची मला जाणीव आहे. मुंबईत ज्यांचा आवाज नाही, त्यांचा आम्हाला आवाज बनवायचा आहे. म्हणूनच आम्ही मागील पाच वर्षात मुंबईतील आमदारांनी कोण कोणती विकास कमी केली, याचा भांडाफोड करून आम्ही मुंबईकरांसमोर जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित मुंबई प्रदेशाध्यक्ष नवाब मलिक यांनी येथील 'ईटीव्ही भारत'शी बातचीत करताना सांगितले.. वीस वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत ताकत ही मर्यादित राहिली आहे. मुंबईत सुरवातीला आमचा एक आमदार होता. नंतर त्याचे तीन झाले. तीन वरून पुन्हा आम्ही एक वर आलो. आणि मागील निवडणुकीत आमचा एकही आमदार मुंबईत आला नाही. यादरम्यान मुंबईत आम्हाला 14 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणता आले नाही. त्यामुळे आम्हाला आमची कमतरता माहीत आहे. तरीसुद्धा दोन महिन्यात येत असलेल्या विधानसभा निवडणुकीत कमीत कमी चार आमदार निवडून आणू अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आम्ही त्यावर फोकस करणार आहोत, असेही ते म्हणाले. मुंबईत असंख्य प्रश्न आहेत. त्यासाठीचे कार्यक्रम तयार करून मुंबईतील कामगार, महिला, चाळीतील रहिवासी, व्यापारी नोकरदार त्याच्या प्रश्नाला आम्ही वाचा फोडण्याचे काम करणार असून त्यातूनच आम्हाला मुंबईचा आवाज बनण्याचे काम करायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष लोकांचा आहे लोकांचा आवाज आहे. तो आवाज मला बनायचे आहे. मुंबईतील आमदार नेते हे लोकांमध्ये जात नसल्याने त्यांच्या प्रश्नाला वाचा फुटत नाही. त्यामुळे मुंबईसाठी कोणी लढतोय, हा विश्वास वाटल्यास लोक आपोआपच आपल्या सोबत येतील,असा मला विश्‍वास असल्याचे मलिक म्हणाले. मुंबईत सर्वात मोठा प्रश्न हा त्यांच्या घरांचा आणि पुनर्विकासाचा आहे. या सरकारने 2022 पर्यंत सगळ्यांना घरे देऊ असे आश्वासन दिले, परंतु मागच्या पाच वर्षात मुंबईतील तब्बल दोन लाख लोकांना बेघर करण्याचे काम सरकारने केले. एकीकडे सर्वांना घरे देण्याची घोषणा करायची आणि दुसरीकडे पात्र आणि अपात्र भानगडी करून लोकांना रस्त्यावर आणण्याचे हे काम सरकार करत आहे. त्यामुळे ही मंडळी बोलतात एक आणि करतात एक. म्हणूनच मुंबईतील घरांच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर आहे. इमारत पडल्यावरही त्यासाठी पुनर्विकासासाठी मंजुरी मिळत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात की, मुंबईतील 40 हजार लोकांच्या घरांचे प्रश्न मी सोडवले. परंतु मुंबईत 33 सात नावाचा डीसीआर आणलेला आहे. त्यातील शिफारशीला मंजुरी दिली जात नाही. अजूनही महापालिकेचे आयुक्त यासाठी एवढे आम्ही शिफारशी मागून प्रस्ताव तयार करत असल्याचे सांगत असून त्यासाठीच्या सर्व फायली केवळ पैसे खाण्यासाठी दाबून ठेवलेल्या जात आहेत. मुंबईतील जनता इमारती कोसळून मरत असताना यांना मात्र आम्हाला मलिदा पाहिजे हा उद्योग सुरू आहे. म्हणून मुंबईत पुनर्विकासाची कामे थांबलेली आहेत. म्हणूनच लोकांना घरे मिळत नाहीत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील मतदार निहाय प्रश्न समजून घेऊन निवडणुकीत ज्या आमदारांनी मागील पाच वर्षात केवळ खंडणी वसूल केली आणी पैसे कमावले अशा आमदारांच्या विकासकामांचा भांडाफोड करणार आहोत आणि हेच प्रश्न समोर जाणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.

Body:मागील पाच वर्षात मुंबईतील आमदाराने कोणते विकास कामे केले यांचा भांडाफोड करू

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.