मुंबई - भाजपा शेतकरी मोर्चाबाबत काय विचार करते हा त्यांचा अधिकार आहे. आमचे सरकार दडपशाही करणारे नाही. म्हणून त्यांनी काय बोलावे, तो त्यांचा अधिकार आहे, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त घाटकोपरमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर मते व्यक्त केली. यावेळी त्यांनी रक्तदाते आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
रक्ताचा तुटवडा
राज्यात रक्ताचा तुटवडा आहे म्हणून वाढदिवस रक्तदान करून साजरा केला. प्रत्येक पक्ष, संघटना 365 दिवस इलेक्शन मोडमध्ये असतात, असे त्या म्हणाल्या. तर येणारी महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याबाबत बाबत तीन पक्षांचे नेते निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया सुळे यांनी व्यक्त केली.