ETV Bharat / city

Eknath Khadse : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवर? म्हणाले 'यात काय गैर' - NCP MLA Eknath Khadse

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे ( Nationalist Congress leader Eknath Khadse ) यांनी अमित शहा यांची भेट ( Eknath Khadse met Amit Shah ) घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपाच्या ( Eknath Khadse join BJP? ) वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटण्यात गैर काय? मी अजूनही राष्ट्रवादीतच असे स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी दिले आहे.

Eknath Khadse
एकनाथ खडसे
author img

By

Published : Sep 24, 2022, 11:15 AM IST

Updated : Sep 24, 2022, 11:59 AM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विधान परिषदेचे विद्यमान आमदार एकनाथ खडसे ( Nationalist Congress leader Eknath Khadse) यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी ( Eknath Khadse met Amit Shah ) प्रयत्न केला. आपल्या स्नुषा खासदार रक्षा खडसे ( MP Raksha Khadse ) यांच्यासोबत त्यांनी दिल्ली गाठली होती. त्यानंतर एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये सामील ( Eknath Khadse join BJP? ) होणार अशा पद्धतीच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधान आले आहे. मात्र यासंदर्भात बोलताना एकनाथ खडसे यांनी स्वतःच या केवळ चर्चा आहेत. आपण गृहमंत्र्यांना भेटू शकत नाही का? असा सवाल उपस्थित केला आहे.

शहांच्या भेटीला एकनाथ खडसे - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी एकनाथ खडसे, त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे या दिल्लीला गेल्या होत्या. शहा यांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे त्यांना भेट घेता आली नाही. मात्र. अमित शहा यांच्याबरोबर फोनवरून एकनाथ खडसे यांनी संवाद साधला आहे. भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फारसे मन करमत नसल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी शहा यांची भेट घेण्याचा आणि त्यांच्याशी संवाद साधण्याच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा खडसे भाजपच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे.

मी यापुढेही बोलणार - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आपले जुने संबंध आहेत. यापूर्वी आपण अनेकदा त्यांच्याशी संवाद साधला आहे. त्यामुळे काही कामानिमित्त त्यांच्याशी केंद्रीय गृहमंत्री म्हणून संवाद साधला तर त्यात चूक काय? मी यापुढेही शहा यांच्यासोबत संवाद साधणार आहे. मी अनेकदा देवेंद्र फडणवीस यांच्याशीही संवाद साधत असतो. त्यामुळे मी लगेच भाजपात गेलो असे मानण्याची गरज नाही अशा शब्दात खडसे यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे.

मी भाजपात खडसे राष्ट्रवादीत - रक्षा खडसे दरम्यान या संदर्भात भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आम्ही कामानिमित्त शहा यांना संपर्क साधला होता. याचा अर्थ पक्षात प्रवेश घेण्यासाठी चर्चा झाली असा होत नाही मी भाजपची खासदार आहे आणि भाजपातच आहे तर एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत असेही, रक्षा खडसे यांनी सांगितले.

मात्र, या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपामध्ये जाणार का याबाबत तर्कवितर्क लढवले जात असून लवकरच त्याबाबत चित्र स्पष्ट होईल. एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्री पदापासून डावले तसेच भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी भाजपाला रामराम करून राष्ट्रवादीची वाट धरली होती. आता पुन्हा ते माहेरी परतणार का याबाबत लवकरच चित्र स्पष्ट होईल.या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी बोलण्यास नकार दिला तर, भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Last Updated : Sep 24, 2022, 11:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.