मुंबई - राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या maharashtra Monsoon sessions पाचव्या दिवशी आज विधान भवनाच्या MLA Rada Vidhan Bhavan Mumbai पायऱ्यांवर सत्ताधारी व विरोध यांच्या जोरदार राडा झाला. दोन्ही बाजूनी घोषणाबाजी करत हे आमदार एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचे चित्र पाहायला भेटले. या गोंधळाला सर्वस्वी सत्ताधारी जबाबदार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी NCP MLA Amol Mitkari criticized government यांनी सांगितले आहे. आज शिंदे गटाच्या आमदारांनी शिवीगाळ Shinde group MLA abused केली, धक्काबुक्की केली. यामुळे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर गोंधळ उडाला. अखेर अजित पवार Ajit Pawar Opposition Leader आले आणि आम्हाला बाजुला होऊया म्हणाले. त्यामुळे आम्ही बाजुला झालो, असे अमोल मिटकरी MLA Amol Mitkari यांनी म्हटले आहे.
पन्नास खोके एकदम ओके हा नारा दिल्याने शिंदे गटातील आमदारांना झोंबल्याने त्यानी हे कृत्य केले आहे. आम्ही त्यांना डिवचले नाही त्यांनीच आम्हाला डिवचले आहे. धक्काबुक्की करणारे आमदार कोण होते? त्यांना मी ओळखत नाही. आम्हाला अजितदादा पवार यांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर बोलावले होते. त्यानुसार आम्ही आंदोलनासाठी आलो होते. परंतु जे काही अशोभनीय वर्तन केले आहे, ते संविधानाला धरून नाही, असे मिटकरींनी म्हटले आहे.
आमदारांमध्ये धक्काबुक्की व शाब्दिक चकमक : विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा झाला. विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी आणि आंदोलने याआधीही केली जात होती. विरोधक आमदार विधानसभेच्या पायऱ्यांवर येण्याआधीच शिंदे गटातील आमदारांनी त्याठिकाणी येऊन विरोधकांविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर विरोधी पक्षातील आमदार विधानसभेच्या पायऱ्यांजवळ येताच त्यांनीही सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही गटातील आमदारांमध्ये शाब्दिक बाचाबाजी झाली. पुढे याचे रुपांतर धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यातही झाले. याप्रसंगी शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी एकमेकांना भिडले. यावेळी दोन्ही गटात जोरदार धक्काबुक्कीही झाली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, प्रताप सरनाईक, शहाजी बापू पाटील यांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांना बाजुला करण्याचा प्रयत्न केला. यानंतर मिटकरी यांनी शिवसेनेच्या आमदारांवर गंभीर आरोप केला आहे.
हेही वाचा - Hangama on steps of Maharashtra Assembly विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे आणि भाजप गटाचा राडा