ETV Bharat / city

Supriya Sule On Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरे यांचा मला अभिमान, शिंदे यांच्याकडे बहुमताचा आकडा नाही - सुप्रिया सुळे - सुप्रिया सुळे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मला अभिमान आहे. आज बाळासाहेबांच्या अनुपस्थितीत त्यांनी (उद्धव) आपल्या आमदारांना एक संवेदनशील आवाहन केले आहे. मी काही ज्योतिषी नाही, पण मला वाटतं की, कुटुंबातील कोणी निघून गेले असेल तर त्यांना परत आणण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने प्रयत्न करावेत, असे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. त्या मुंबईत माध्यमांशी बोलत होते. ( Supriya Sule On Maharashtra Political Crisis )

Supriya Sule On Maharashtra Political Crisis
सुप्रिया सुळे
author img

By

Published : Jun 28, 2022, 5:13 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मला अभिमान आहे. आज बाळासाहेबांच्या अनुपस्थितीत त्यांनी (उद्धव) आपल्या आमदारांना एक संवेदनशील आवाहन केले आहे. मी काही ज्योतिषी नाही, पण मला वाटतं की, कुटुंबातील कोणी निघून गेले असेल तर त्यांना परत आणण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने प्रयत्न करावेत, असे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. त्या मुंबईत माध्यमांशी बोलत होते. ( Supriya Sule On Maharashtra Political Crisis )

सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

संबंध दीर्घकाळ टिकतील - मी उद्धवजींचे ट्विट पाहिले आहे. माझ्या या कुटुंबाशी (ठाकरे) भावना जडल्या आहेत. सरकारे येतील आणि जातील, पण हे संबंध दीर्घकाळ टिकतील असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमत नाही - एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमताचा आकडा 144 नाही. त्यांच्याकडे फक्त 50 आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे बहुमत आहे असे म्हणता येणार नाही, असे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना सांगितले. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याला ईडीच्या नोटिसा येत आहेत. अशा गोष्टी देश आणि संविधानासाठी चांगल्या नाहीत, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीचे समन्स बजावले. यावर बोलताना सुळे यांनी सांगितले.

...आता ते आम्हाला टार्गेट करत आहेत - जे राष्ट्रवादीच्या विरोधात बोलतात (एकनाथ शिंदे गटातील) ते एकेकाळी राष्ट्रवादीत होते. दीपक भाऊ राष्ट्रवादीत होते, तर उदय सामंत पक्षाच्या युवा शाखेत होते. मला वाईट वाटते की त्यांनी राष्ट्रवादी सोडली तेव्हा आम्ही त्यांना वाईट शब्दही बोललो नाही, पण आता ते आम्हाला टार्गेट करत आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

हेही वाचा - CM appeals to MLA in Guwahati : शिवसेना पक्षप्रमुख पुन्हा झाले भावूक, काल गद्दार ठरवलेल्या बंडखोरांची आता वाटतेय काळजी

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेंसह आम्ही आमच्या इच्छेने गुवाहाटीला आलो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.