ETV Bharat / city

Rajya Sabha Election 2022 : महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येणार - प्रफुल्ल पटेल - राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांनी दाखल केला अर्ज

महाविकास आघाडीकडे ( Mahavikas Aghadi ) चारही उमेदवार निवडून आणण्यासाठी योग्य संख्याबळ आहे. राज्यसभेसाठी ( Rajyasabha 2022 ) मतदान करताना खुल्या मतदान पद्धतीने करावे लागते. महाविकास आघाडीचे सर्व आमदार आणि सहकारी अपक्ष आमदार महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देतील, असा विश्वास प्रफुल्ल पटेल ( Praful Patel ) यांनी व्यक्त केला आहे.

प्रफुल्ल पटेल
प्रफुल्ल पटेल
author img

By

Published : May 30, 2022, 7:04 PM IST

मुंबई -महाराष्ट्रातून आज (सोमवारी) राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आले असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांनी विधान भवनात आपला उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रफुल्ल पटेल यांनी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाकडून सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला असला तरी, महाविकास आघाडीकडे ( Mahavikas Aghadi ) चारही उमेदवार निवडून आणण्यासाठी योग्य संख्याबळ आहे. राज्यसभेसाठी ( Rajyasabha 2022 ) मतदान करताना खुल्या मतदान पद्धतीने करावे लागते. महाविकास आघाडीचे सर्व आमदार आणि सहकारी अपक्ष आमदार महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देतील, असा विश्वास प्रफुल्ल पटेल ( Praful Patel ) यांनी व्यक्त केला आहे.

गेले बत्तीस वर्ष राजकारणात आपण सक्रिय आहोत. याआधीही चार वेळा संसदीय राजकारणात आपण सहभाग घेतला. पुन्हा एकदा आपल्याला राष्ट्रवादीकडून राज्यसभा उमेदवारी नामांकन भरले असून, पुढील सहा वर्ष आपल्याला काम करण्याची संधी मिळाली असल्याचे समाधान प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी व्यक्त केले.

अपक्ष आमदारांचा पाठिंबा महाविकास आघाडीला : महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाला सहाव्या जागेसाठी काही मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. मात्र अपक्ष आमदाराने महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे. त्या आमदारांच्या पाठिंब्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी लागणाऱ्या संख्याबळ महाविकास आघाडी पूर्ण करते. त्यामुळे राज्यसभेवरील सहाव्या जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवारच निवडून येईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - Piyush Goyal Filed Rajya Sabha Nomination : शिवसेनेने केलेला विश्वासघाताचा वचपा काढणार - पियूष गोयल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.