ETV Bharat / city

दुष्काळी भागातील महिलांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीचा पुढाकार; महिला आयोगासमोर वाचला समस्यांचा पाढा - दौरा

राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी दुष्काळग्रस्त महिलांच्या समस्याचा महिला आयोगाकडे पाढा वाचला. यावेळी त्यांनी दुष्काळग्रस्त महिलांना मदत करण्याची मागणी केली.

चित्रा वाघ
author img

By

Published : May 21, 2019, 9:50 AM IST

मुंबई - महाराष्ट्रात दुष्काळामुळे जनावरांना चारा, पाणी नसल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी पाहणी केली. दुष्काळग्रस्त भागातील महिलांसमोर असलेल्या समस्यांचा पाढा वाघ यांनी महिला आयोगासमोर वाचला. या महिलांना मदत करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

चित्रा वाघ

राज्यात भीषण दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. आम्ही काही दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा केला. या भागातील दुष्काळ भीषण आहे. भाकरी मिळाली, तरी तिच्यासोबत लागणाऱ्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ या भागातील नागरिकांवर आली आहे, असे अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न सध्या राज्यातील शेतकऱ्यांचे आहेत. याचा सरळसरळ परिणाम ग्रामीण भागातील महिलांच्या, मुलींच्या जीवनावर होत आहे. पाणी भरुन भरुन महिलांना मणक्यांचे, कमरेचे आजार जडत आहेत. या विषयी आम्ही महिला आयोगाशी चर्चा केल्याचे वाघ यांनी सांगितले.

काय आहेत मागण्या

१) ग्रामीण भागातील महिलांचे पशुधन शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या यांना चारा छावणीमध्ये समाविष्ट करावे. किंवा योग्य तो दुष्काळभत्ता देण्यात यावा.
२) प्रत्येक चारा छावणीमध्ये मोबाईल टॉयलेटची सुविधा करण्यात यावी. जेणेकरुन महिलावर्गाची गैरसोय होणार नाही.
३) एका कार्डवर फक्त ५ जनावरांना चारा छावणीत मान्यता आहे, ती रद्द करुन सरसकट जनावरांना मान्यता मिळावी.
४) स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा कोटा वाढवावा.
५) लोकसंख्येमध्ये झालेली वाढ लक्षात घेत मागणीप्रमाणे टँकर मंजूर करावेत.
६) पिण्याच्या स्वच्छ पाण्याची तातडीने सोय उपलब्ध करुन देणे.
७) राज्यभरात पाणी भरताना कितीतरी महिलांचा, मुलींचा मृत्यू झाला, कितीतरी जणींना अपंगत्व आलं. त्यावर पाणी भरण्यासाठी वॉटरव्हीलचे वाटप सरकारकडून व्हावे.
८) रोजगार हमी योजनेची कामे तातडीने हाती घेणे.
९) ज्येष्ठ महिलांसाठी आरोग्यविषयक तात्काळ मदत उपलब्ध करुन देणे. त्यांना ज्येष्ठ नागरिक भत्ता तातडीने उपलब्ध करुन देणे.
१0) तात्पुरत्या स्वरुपाची बालगृहे व त्यांना पोषण आहार उपलब्ध करुन देणे.

Intro:मुंबई।
महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. जनावरांना चारा नाही, पिण्यासाठी पाणी नाही अशी बिकट परिस्थिती काही भागात निर्माण झाली आहे. याभागांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी पाहणी करत त्या भागात महिलांना निर्माण होत असलेल्या समस्या आज महिला आयोगासमोर वाचल्या आणि या महिलांना मदत करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
Body:राज्यात भीषण दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. आम्ही काही दुष्काळी जिल्ह्यांचा आम्ही दौरा केला. या भागातील दुष्काळ भीषण आहे. भाकरी मिळाली तरी तिच्यासोबत लागणाच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ या भागात राहणाऱ्या लोकांवर आली आहे. असे अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न सध्या राज्यातील शेतक-यांचे आहेत. याचा सरळसरळ परिणाम ग्रामीण भागातील महिलांच्या, मुलींच्या जीवनावर होत आहे. पाणी भरुन भरुन महिलांना मणक्यांचे, कमरेचे आजार जडत आहेत. या विषयी आम्ही आज महिला आयोगाशी चर्चा केली असे वाघ यांनी सांगितले.

काय आहेत मागण्या

१) ग्रामीण भागातील महिलांचे पशुधन शेळ्या, मेंढया, कोंबडया यांना चाराछावणीमध्ये समाविष्ट करावे किंवा योग्य तो दुष्काळभत्ता देण्यात याता.

२) प्रत्येक चारा छावणीमध्ये मोबाईल टॉयलेटची सुविधा करण्यात यावी. जेणेकरुन महिलावर्गाची गैरसोय होणार नाही.

३) एका कार्डवर फक्त ५ जनावरांना चारा छावणीत मान्यता आहे, ती रद्द करुन सरसकट जनावरांना
मान्यता मिळावी.

४) स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा कोटा वाढवावा.

५) लोकसंख्येमध्ये झालेली वाढ लक्षात घेत मागणीप्रमाणे टैंकर मंजूर करावेत.

६) पिण्याच्या स्वच्छ पाण्याची तातडीने सोय उपलब्ध करुन देणे.

७) राज्यभरात पाणी भरतांना कितीतरी महिलांचा, मुलींचा मृत्यू झालाय कितीतरी जणींना अपंगत्व
आलयं. त्यावर पाणी भरण्यासाठी वॉटरव्हील चे वाटप सरकारकडून व्हावे.

८) रोजगार हमी योजनेची कामे तातडीने हाती घेणे.

९) जेष्ठ महिलांसाठी आरोग्यविषयक तात्काळ मदत उपलब्ध करुन देणे. त्यांना जेष्ठ नागरीक भत्ता
तातडीने उपलब्ध करुन देणे.

१0) तात्पुरत्या स्वरुपाची बालगृहे व त्यांना पोषण आहार उपलब्ध करुन देणे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.