ETV Bharat / city

भाजपकडून 'शिळ्या कढीला ऊत' आणण्याचे काम..!, भुजबळांचा सोमैय्यांवर पलटवार - भुजबळांवर भ्रष्टाचार व मनी लाँड्रिंगचे आरोप

भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी केलेल्या आरोपांना छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिले आहेत. भुजबळ म्हणाले, भारतीय जनता पक्षाकडून या आधीही माझ्यावर आरोप झाले आहेत. त्या संबंधीची सुनावणी मुंबई उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालयात सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैय्या यांनी आधीही माझ्यावर अशा प्रकारचे आरोप केले आहेत. मात्र त्यांच्याकडून केवळ 'शिळ्या कढीला ऊत 'आणण्याचे काम सुरू आहे. किरीट सोमैय्या यांनी याआधीही मुंबईमधली नरिमन पॉईंट येथील मालमत्तेबाबत आरोप केले होते.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal
author img

By

Published : Sep 1, 2021, 6:59 PM IST

मुंबई - भारतीय जनता पक्षाकडून या आधीही माझ्यावर आरोप झाले आहेत. त्या संबंधीची सुनावणी मुंबई उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालयात सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैय्या यांनी आधीही माझ्यावर अशा प्रकारचे आरोप केले आहेत. मात्र त्यांच्याकडून केवळ 'शिळ्या कढीला ऊत 'आणण्याचे काम सुरू आहे. किरीट सोमैय्या यांनी याआधीही मुंबईमधली नरिमन पॉईंट येथील मालमत्तेबाबत आरोप केले होते. आजही नाशिकपासून 20 किलोमीटर दूर असलेल्या आर्म स्ट्रॉंग एनर्जी कंपनीची पाहणी केली. ही मालमत्ता 1980 मध्ये घेतली असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. आज मुंबईतील शासकीय निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.

या सर्व मालमत्तेसंबंधी मुंबई सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय मध्ये सुनावणी सुरू आहे. मात्र तरीही भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा एकदा अशाच प्रकारचे जुने आरोप नव्याने करण्याचा प्रयत्न केला जातोय. या सर्व प्रकरणावर आधीपासूनच आम्ही न्यायालयीन लढा देत असल्याचे यावेळी छगन भुजबळ यांनी सांगितले. केवळ आरोप करण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत असल्याचे भुजबळ म्हणाले.

काय म्हणाले किरीट सोमैय्या ?

भाजप नेते किरीट सोमैय्या हे बुधवारी नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी भुजबळांवरती भष्ट्राचाराचे आरोप केले. सोमैय्या म्हणाले, की आर्म स्ट्रॉंग कंपनीत छगन भुजबळ यांनी आपला पैसा पांढरा केला. भुजबळ हे मुंबईतील नऊ मजली घरात राहतात. तो कुणाचा आहे ? असा सवाल भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी उपस्थित केला. भुजबळांचे घर कुणाचे आहे, हे मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांनी मला सांगावे, असे आवाहनही सोमैय्या यांनी केले.

हे ही वाचा - मराठा आरक्षणप्रश्नी छत्रपती संभाजीराजे घेणार राष्ट्रपतींची भेट, राज्यातील प्रमुख पक्षाचे प्रतिनिधी असणार उपस्थित

सौमय्या यांचे भुजबळांवर भ्रष्टाचार व मनी लाँड्रिंगचे आरोप -

सोमैय्या यांनी पत्रकार परिषद घेत छगन भुजबळांवर भ्रष्टाचार व मनी लाॅण्ड्रिंगचे गंभीर आरोप केले. मुंबईत बांधलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घरासाठी भुजबळ यांनी पैसा कुठून आणला. मुंबईतदेखील भुजबळ यांच्या भुजबळ महालची पाहणी करायला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा - मुंबईतील भुजबळांचे घर कोणाचे हे मुख्यमंत्री व शरद पवारांनी सांगावे, किरीट सोमैय्यांचे आव्हान

सोमैय्या म्हणाले, की मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नामी आणि बेनामी संपत्ती जाहीर करावी. त्यांची १२० कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. आज मी भुजबळ यांची आर्म स्ट्रॉंग एनर्जी कंपनीची पाहणी केली. या कंपन्यांमधील पैसा कुठून आला? आर्म स्ट्रॉंग कंपनीत भुजबळ यांनी आपला पैसा पांढरा केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. भुजबळ यांच्याशी निगडीत अनेक बोगस कंपन्या आहेत. भुजबळांची पनवेल, नाशिक, अंधेरी व सांताक्रूझ याठिकाणी असलेली मालमत्ता प्राप्तिकर विभागाने जप्त केल्याची त्यांनी माहिती दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.