मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका कार्यक्रमादरम्यान म्हटलेल्या कवितेवर सध्या राज्याच्या राजकारणात वादळ उठलं आहे. याबाबत सोशल मीडियावर अनेक पोस्ट ही केल्या जात आहेत. मात्र "बागलाणकर" या ट्विटर हँडल वरून शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपाहार्य आणि प्रक्षोभक ट्विट करण्यात आले आहे. "वेळ आली आहे, बारामतीच्या गांधीसाठी बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची" असे ट्विट या ट्विटर हँडल वरून करण्यात आले आहे. या ट्विटवरून मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.
-
काय पातळी वर हे सगळे होते आहे ... ह्या विकृत इसमा विरुद्ध कडक कारवाई करा @MumbaiPolice @CPMumbaiPolice @DGPMaharashtra @PuneCityPolice @ThaneCityPolice pic.twitter.com/WY5TSaKURZ
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">काय पातळी वर हे सगळे होते आहे ... ह्या विकृत इसमा विरुद्ध कडक कारवाई करा @MumbaiPolice @CPMumbaiPolice @DGPMaharashtra @PuneCityPolice @ThaneCityPolice pic.twitter.com/WY5TSaKURZ
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 13, 2022काय पातळी वर हे सगळे होते आहे ... ह्या विकृत इसमा विरुद्ध कडक कारवाई करा @MumbaiPolice @CPMumbaiPolice @DGPMaharashtra @PuneCityPolice @ThaneCityPolice pic.twitter.com/WY5TSaKURZ
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 13, 2022
सायबर सेलकडे तक्रार - शरद पवार यांच्याविषयी केलेल्या ट्विटवर जितेंद्र आव्हाड यांनी रिट्विट केले आहे. ते म्हणाले, "काय पातळीवर हे सगळे गेले आहेत, या विकृत इसमाविरुद्ध कडक कारवाई करा" असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले असून हे ट्विट करताना त्यांनी मुंबई पोलीस, पोलीस महासंचालक, पुणे पोलीस आणि ठाणे पोलिसांना टॅग केले आहे. तर शरद पवार यांची बदनामी बीजेपी फॉर महाराष्ट्र ट्विटर हँडल बदनामी केल्याप्रकरणी आणि बागलाणकर या ट्विटर हॅण्डलवरील वादग्रस्त ट्विट करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.
व्हिडिओ वरून पेटला वाद - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी हिंदू देव-देवतांच्या बाप आपण असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र हा व्हिडीओ सोयीस्करपणे अर्धवट दाखवण्यात आला आहे. एका कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांनी एक कविता वाचून दाखवली होती. त्यातील काही भाग काटछाट करून हा व्हिडीओ तयार करण्यात आला असल्याचे स्पष्टीकरण खुद्द शरद पवार यांनी दिले आहे. तसेच ती कविता पुन्हा एकदा 12 मे ला पुरंदर येथील कार्यक्रमात वाचून दाखवली. मात्र त्यानंतरही सोशल मीडियावर याबाबतीत कमेंट्स केल्या जात आहेत. त्यातच थेट शरद पवार यांच्यावर हल्ला करणारी ही पोस्ट अत्यंत चिंताजनक असून याबाबत पोलिसांनी लक्ष घालण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून पोलिसांकडे मागणी केली आहे.