ETV Bharat / city

Sharad Pawar Support Amol Kolhe : अमोल कोल्हे यांच्या नथुराम गोडसेंच्या भूमिकेवर शरद पवार म्हणाले... - Amol Kolhe In Nathuram Godase Role

राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे ( NCP MP Amol Kolhe ) यांच्या 'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटातील ( Why I Killed Gandhi Movie ) भूमिकेमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या चित्रपटात अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका ( Amol Kolhe In Nathuram Godase Role ) साकारली आहे. चित्रपटात नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण करण्यात आल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'एक कलाकार म्हणून त्यांचे समर्थन' करत असल्याची भूमिका पवारांनी घेतली. भाजप कधीपासून गांधीवादी झाला, असा सवालही पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

sharad-pawar
शरद पवार
author img

By

Published : Jan 21, 2022, 1:50 PM IST

Updated : Jan 21, 2022, 4:35 PM IST

मुंबई - राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे ( NCP MP Amol Kolhe ) यांच्या 'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटातील ( Why I Killed Gandhi Movie ) भूमिकेमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या चित्रपटात अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका ( Amol Kolhe In Nathuram Godase Role ) साकारली आहे. चित्रपटात नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण करण्यात आल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेच्या अगदी परस्पर विरोधी भूमिका अमोल कोल्हे यांनी साकारली आहे. याबाबत आता सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'एक कलाकार म्हणून त्यांचे समर्थन' करत असल्याची भूमिका पवारांनी घेतली. भाजप कधीपासून गांधीवादी झाला, असा सवालही पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

अमोल कोल्हे यांच्या नथुराम गोडसेंच्या भूमिकेवर शरद पवार म्हणाले...

कथानकाची गरज, विचारधारेशी संबंध नाही- कोल्हे

"एखाद्या चित्रपटाच्या कथानकानुसार अभिनेत्याला भूमिका वठवावी लागते. चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्या सांगण्यानुसार त्याला काम करावे लागते. कित्येकदा हे काम त्याच्या भूमिकेविरोधात, मनाविरोधात असू शकते. परंतु एक कलावंत म्हणून त्याला काम नाकारता येत नाही. या चित्रपटातील माझी भूमिका ही मी राजकारणात येण्याआधी चित्रित झालेली आहे. त्यामुळे त्या भूमिकेचा माझा राजकारणाशी संबंध जोडला जाऊ नये" असे मत कोल्हे यांनी व्यक्त ( Amol Kolhe Reacted On Godase Role ) केले. यासंदर्भात जर माझ्या पक्षाने वेगळी भूमिका घेतली अथवा चित्रपटाला विरोध दर्शवला तरीही माझा त्याला आक्षेप असणार नाही, असेही डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

अमोल कोल्हे यांना पक्ष नोटीस काढणार नाही - जयंत पाटील

अमोल कोल्हे यांच्यावर संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी जी भूमिका मांडली आहे तीच भूमिका पक्षाची आहे. अमोल कोल्हे यांनी 2017 मध्ये हा रोल केलेला आहे. त्यानंतर त्यांनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचेही रोल केलेले आहेत. त्यानंतर आमच्या पक्षात ते आलेले आहेत. भूमिका केली म्हणजे तो त्यांचा विचार म्हणता येणार नाही. नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण होऊ नये हीच आमची भूमिका आहे. मी हा चित्रपट पाहिलेला नाही. अमोल कोल्हे यांच माझे काही बोलणे झालेले नाही. चित्रपटात व्हिलन काम करतो याचा अर्थ तो विचार त्यांचा नसतो. अमोल कोल्हे यांना पक्ष नोटीस काढणार नाही अशी माहिती जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा - Jitendra Awhad On Amol Kolhe : अमोल कोल्हेंच्या चित्रपटाला विरोध करणार, आव्हाड आक्रमक

हेही वाचा - Amol Kolhe Reacted On Godase Role : राजकारण आणि अभिनयाची गल्लत करू नका - खासदार अमोल कोल्हे

Last Updated : Jan 21, 2022, 4:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.