ETV Bharat / city

OBC Reservation Issue : एकदाची जातनिहाय जनगणना कराच; शरद पवारांचे केंद्र सरकारला आव्हान - शरद पवारांचे केंद्र सरकार आव्हान

ओबीसी आरक्षण प्रश्न ( OBC reservation Issue ) निर्माण झालेला पेच हा जातनिहाय जनगणने ( Caste wise census ) शिवाय सुटणार नाही, मात्र केंद्र सरकारची ( Central Government ) ती मानसिकता नाही. असा आरोप करत एकदाची जातनिहाय जनगणना कराच, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Cheif Sharad Pawar ) यांनी दिले आहे.

NCP Cheif Sharad Pawar
NCP Cheif Sharad Pawar
author img

By

Published : May 25, 2022, 4:57 PM IST

Updated : May 25, 2022, 9:14 PM IST

मुंबई - ओबीसी आरक्षणासह ( OBC Reservation ) अन्य जातींच्या आरक्षणाचा तिढा सोडवायचा असेल, तर जातनिहाय जनगणना हाच त्यावरचा अंतिम उपाय आहे. मात्र केंद्र सरकार ( Central Government ) जाणून-बुजून जातनिहाय जनगणना ( Caste wise census ) करत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Cheif Sharad Pawar ) यांनी आज ( बुधवारी ) मुंबईत केला. केंद्र सरकारने एकदा जात निहाय जनगणना करूनच टाकावी आणि काय ते सत्य जनतेसमोर यावे, अशी मागणी करताना केंद्र सरकार मात्र हे करणार नाही. कारण त्यांची मानसिकताच वेगळी आहे. त्यांना जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करायचे आहे. देशांमध्ये अस्वस्थता निर्माण करायची आहे, असा आरोपही शरद पवार यांनी यावेळी केला आहे.

ओबीसी जनगणनाबाबत प्रतिक्रिया देताना शरद पवार आणि छगन भुजबळ

'जातनिहाय जनगणनेला का घाबरतेय केंद्र सरकार?' : केंद्र सरकारने गोळा केलेला डाटा हा चुकीचा असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालय देऊन ओबीसी आरक्षणामध्ये खोडा घातला आहे. एकीकडे जनगणना आयुक्त ही माहिती खरी असल्याचे सांगतात तर दुसरीकडे सरकार ही माहिती खोटी असल्याचा म्हणतात. नेमकी सत्यता येण्यासाठी राष्ट्रीय जनगणना होणे गरजेचे आहे. मात्र केंद्र सरकार कोरोनाचे कारण देऊन ती करत नाही. मग आमच्याकडून कोरोना काळात इंपेरिकल डाटा गोळा करण्याची अपेक्षा केंद्र सरकार कसे काय करते ? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. सरकारने ताबडतोब जनगणना करावी आणि बहुजन समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी ही छगन भुजबळ यांनी यावेळी केली.

'जातीनिहाय जनगणना न करणारे भाजपाच जबाबदार' : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडी सरकारही प्रयत्नशील आहे. विधानसभेचा अध्यक्ष असताना मी स्वत: जातीनिहाय जनगणना करावी असा ठराव मांडून तो संमत करून घेतला. जातीनिहाय जनगणना झाली तर असे वाद निर्माणच होणार नाहीत परंतु केंद्रातील भाजपा सरकार त्यावर निर्णय घेत नाही. ओबीसी आरक्षणाच्या आजच्या परिस्थितीस भाजपाच जबाबदार आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

प्रतिक्रिया देताना अतुल लोंढे

जनगणनेवर भाजपाचे मौन : केंद्र सरकार जातनिहाय जनगणना का करत नाही जात निहाय जनगणना केल्यास आरक्षणाचे प्रश्न सुटतील, अशी विरोधी पक्षांची धारणा असल्याबाबत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

हेही वाचा - आमची हक्काची जागा कोणालाही देणार नाही; संभाजीराजेंच्या उमेदवारीवर राऊतांची प्रतिक्रिया

Last Updated : May 25, 2022, 9:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.