ETV Bharat / city

सुप्रिया सुळेंवरील आक्षेपार्ह टीका चंद्रकांत पाटलांना भोवणार - चंद्रकांत पाटलांना भोवणार

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ) यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे भाजप नेते आमदार चंद्रकांत पाटील ( MLA Chandrakant Patil ) वादात सापडले आहेत. सर्व स्तरातून पाटील यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून पाटील यांना हे प्रकरण चांगलेच भोवणार आहे. तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. खासदार असून तुम्हाला कळत नाही, असे विधान केले. तसेच तुम्ही दिल्लीत जा, नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या, असे विधान पाटील यांनी ओबीसी आरक्षण आंदोलनावेळी केले होते.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : May 26, 2022, 6:35 PM IST

मुंबई - राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ) यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे भाजप नेते आमदार चंद्रकांत पाटील ( MLA Chandrakant Patil ) वादात सापडले आहेत. सर्व स्तरातून पाटील यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून पाटील यांना हे प्रकरण चांगलेच भोवणार आहे. तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. खासदार असून तुम्हाला कळत नाही, असे विधान केले. तसेच तुम्ही दिल्लीत जा, नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या, असे विधान पाटील यांनी ओबीसी आरक्षण आंदोलनावेळी केले होते. या टीकेला सुप्रिया सुळे यांचे पती यांनी खरमरीत प्रत्युत्तर दिले आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या मुद्द्यावरुन भाजप आक्रमक झाला आहे. या निषेधार्थ भाजपने बुधवारी नरिमन पॉइंट येथील भाजप कार्यालयाचे मंत्रालयावर धडक मोर्चाचे नियोजन केले होते. भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी यात सहभाग घेतला होता. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीही महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका करताना, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले.

पाटील काय म्हणाले - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिल्लीत जाऊन काय केले, हे आम्हाला सांगितले, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक होत प्रतिक्रिया दिली. तुम्ही राजकारणामध्ये कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा. तुम्ही खासदार आहात ना. एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या,” असे वादग्रस्त विधान केले होते.

सदानंद सुळेंचे प्रत्युत्तर - हे आहेत महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष ! ते सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलत आहेत. मला नेहमीच वाटत होते, हे स्त्री द्वेषी आहेत. जिथे शक्य होईल तिथे महिलांचा अपमान करतात. मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे. ती गृहिणी आहे. ती आई आहे आणि यशस्वी राजकारणी आहे. देशातील इतर मेहनती आणि गुणवान महिलांप्रमाणे चंद्रकांत पाटील यांनी सर्वच महिलांचा अपमान केला आहे, असे सदानंद सुळे म्हणाले.

सर्व पक्षीय महिला घर सांभाळून पक्षाचे काम करतात - किशोरी पेडणेकर - शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर ( Shivsena Leader Kishori Pednekar ) यांनी चंद्रकात पाटील यांच्या शब्दांचा निषेध व्यक्त केला. एक जबाबदार नेते असून अनेक वेळा त्यांची जीभ महिलाबद्दल बोलताना घसरते. सर्व पक्षीय महिला घर सांभाळून पक्षाचे काम करतात, असाही टोला महापौरांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

महिलांचे अपमान करणारे विधान - मिटकरी - घरी जा आणि स्वयंपाक करा, ही चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया महिलांचा उघडपणे अपमान करणारी आहे. त्यांनी आपले हे विधान मागे घ्यावे आणि केवळ सुप्रियाताईंचीच नव्हे, तर समस्त महिला वर्गाची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी ( MLA Amol Mitkari ) यांनी केली आहे.

भाजपचे चार्ली चॅम्पियन - भाजपचे चंद्रकांत पाटील जे महिला आमदाराला डावलून आले, त्यांच्याकडून कसली आली अपेक्षा संस्काराची? भाजप पुरुष पदाधिकारी महिलांना मारहाण करतात आणि भाजपचे अध्यक्ष चार्ली चॅम्पियन आहेत. त्यामुळे महिला खासदारांना मसनात पाठवण्याची भाषा करतात सत्तापिपासू, बेताल, वंगाळ भाजप नेते आहेत, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी चंद्रकांत पाटलांसह भाजप नेत्यांवर केला आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या.? - ओबीसी आरक्षणासंदर्भात एकत्र लढायचे असे ठरले होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले. दोन दिवसांत असे काय त्या सरकारने केले आणि दिल्लीत बैठक झाली आणि त्यांना न्याय मिळाला आणि आपल्यावर अन्याय झाला. याचं उत्तर मी केंद्र सरकारला विचारणार आहे. मध्य प्रदेशबाबत जो निर्णय दिला आहे तो अंतिम निर्णय नाही. त्यामुळे हे जे सांगत आहे की मध्य प्रदेशला जमले आणि तुम्हाला जमले नाही यातही खोटेपणा आहे,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा - Chandrakant Patil : सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या 'त्या' वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचा घुमजाव; म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.