ETV Bharat / city

Cruise Drugs Case : एनसीबीचे विशेष तपास पथक सोमवारी मुंबईत परतणार, खंडणीप्रकरणी वानखेडेंची होणार चौकशी - आर्यन खान

मुंबईत कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबी अधिकऱ्यांवर खंडणी मागण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या बाबत स्थापन केलेले विशेष चौकशी पथक (SET) सोमवारी मुंबईत परतणार आहे. असे एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

NCB team
NCB team
author img

By

Published : Nov 6, 2021, 9:01 PM IST

मुंबई - मुंबईत कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबी अधिकऱ्यांवर खंडणी मागण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या बाबत स्थापन केलेले विशेष चौकशी पथक (SET) सोमवारी मुंबईत परतणार आहे. असे एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वात पाच सदस्यीय पथक या प्रकरणाच्या तपासासाठी गठित करण्यात आले आहे. हे पथक क्रुझ कारवाईतील साक्षीदार प्रभाकर साईल व अन्य साक्षीदारांनी केलेल्या आरोपांची चौकशी करणार आहे. साईलचा जवाब नोंदवून हे पथक दिवाळीपूर्वी दिल्लीला रवाना झाले होते.

साईल यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेसह नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांवर खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सोडण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोप साईल यांनी केला होता.

कार्डेलिया क्रुझवर छापा मारून ड्र्ग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी आर्यन खान (23) ला अटक केली होती. त्याला उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे. विशेष चौकशी पथक सोमवारी मुंबईत परतून या प्रकरणाची पुन्हा चौकशी करणार आहे. हे पथक साईलने आरोप केलेल्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करणार आहे. पहिल्यांदा ते साईलचा जवाब नोंदवणार आहेत. कारण या कारवाईतील तो प्रत्यक्षदर्शी आहे. असे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, गरज पडल्यास शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीला चौकशीसाठी बोलावण्यात येईल. आर्यनला पकडल्यानंतर पैसे उकळण्याच्या प्रयत्नात सामील असलेल्या काही व्यक्तींनी दादलानीशी संपर्क साधला होता. 27 ते 30 ऑक्टोबरपर्यंत विशेष तपास पथक मुंबईत होते. त्यावेळी वानखेडेसह आठ लोकांचे जवाब नोंदवले मात्र साईलशी संपर्क होऊ शकला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.