मुंबई - मुंबई एनसीबीकडून भिवंडी परिसरामध्ये नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधीचा ट्रक पकडण्यात आला आहे. या ट्रकमधून 7200 कोडीनयुक्त कफ सिरपच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची किंमत ही अंदाजे 40 लाख रूपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एनसीबीकडून सापळा रचून ही कारवाई आज करण्यात आली आहे.
अंमली पदार्थाची वाहतूक करणार आणि स्विकारणाऱ्या दोघा आरोपींना अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. मागील महिन्यात देखील भिवंडी परिसरामध्ये यांची NCB नाही, अशाच प्रकारे साडेसहा हजार औषधीच्या बॉटल जप्त केल्या होत्या. जप्त करण्यात आलेल्या 7 हजार 200 बाटल्या भिवंडी परिसरात देण्यात येणार होत्या. तेथून त्या मुंबईतील विविध भागात पोहोचवल्या जाणार होत्या. असं आरोपींनी चौकशीत सांगितलं आहे. दरम्यान आरोपींची अधिक चौकशी करण्यात येत आहे. वाहतूक करण्यात येत असलेल्या अंमली पदार्थाची किंमत ही अंदाजे 40 लाख रूपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येत असून मुंबई आणि ठाण्यात कोडीनयुक्त कफ सिरप (CBCS) च्या बेकायदेशीर पुरवठा करणाऱ्या आरोपींचे संबंध शोधण्यासाठी पोलिस त्यांची कोठडी घेणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा - Rahul Gandhi: सोमवारपर्यंत चौकशी पुढे ढकलण्याची राहुल गांधी यांची ED'कडे मागणी