ETV Bharat / city

Aryan Khan Drug Case : के. पी. गोसावीचा जबाब नोंदवणे बाकी; आरोपपत्र दाखल करण्यासाठी NCB ने न्यायालयाकडे वेळ वाढवून मागितला - आर्यन खान ड्रग प्रकरण आरोपपत्र

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा (Aryan Khan Drug Case) तपास दिल्ली एनसीबी SIT (Delhi NCB SIT) पथकाला सोपवण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपपत्र (Chargesheet) मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्याची 31 मार्च शेवटची तारीख आहे. त्या अगोदर NCB एसआयटीने मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल करत, 90 दिवसांची मुदत वाढवून मागितली आहे.

aryan khan drug case
आर्यन खान फाईल फोटो
author img

By

Published : Mar 29, 2022, 8:19 PM IST

मुंबई - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा (Aryan Khan Drug Case) तपास दिल्ली एनसीबी SIT (Delhi NCB SIT) पथकाला सोपवण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपपत्र (Chargesheet) मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्याची 31 मार्च शेवटची तारीख आहे. त्या अगोदर NCB एसआयटीने मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल करत, 90 दिवसांची मुदत वाढवून मागितली आहे. या सुनावणी दरम्यान एनसीबीच्या वकिलांकडून सांगण्यात आले की, या प्रकरणात अद्याप अनेक गोष्टींचा तपास सुरू आहे. तसेच या प्रकरणातील मुख्य साक्षीदार असलेला के. पी. गोसावी याचा जबाब नोंदवणे बाकी असल्याने आम्हाला आणखी वेळ देण्यात यावा. आज सुनावणी वेळी आरोपी वकिलांकडून अर्ज वाचण्याकरिता वेळ हवी असल्याने आज युक्तिवाद होऊ शकला नाही. आता या अर्जावर उद्या (30 मार्च) दुपारी युक्तिवाद होणार आहे.

के.पी.गोसावीचा जबाब नोंदवणे बाकी - एनसीबी SIT पथकाने आपल्या अर्जात म्हटले आहे की, हा अर्ज कायद्याच्या 36A(4) अन्वये दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये पर्यायाने स्वतंत्र ग्राउंड्समध्ये तक्रार दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी म्हणून हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटीने सहा नोव्हेंबर रोजी सुरू केला आहे. एसआयटीने सांगितले की, या प्रकरणात एकूण 69 साक्षीदार आहेत, त्यापैकी 10 साक्षीदारांचा जबाब नोंदवणे अद्याप बाकी आहे.

गोसावीचा जबाब नोंदवणे महत्त्वाचे - या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल फितूर झाल्याने त्याचा जबाब के. पी. गोसावी याच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले होते. मात्र, अद्याप के.पी.गोसावी याचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही. के. पी. गोसावी सध्या पुणे कारागृहात आहे. एसआयटीने तीन वेळा पुणे न्यायालयाकडे के. पी. गोसावीचा जबाब नोंदवून घेण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, ते अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. त्यामुळे अद्याप के. पी. गोसावी याचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही. या प्रकरणात त्याचा जबाब महत्त्वाचा असल्याचे देखील SIT ने आपल्या अर्जात म्हटले आहे.

प्रकरणातील पैशांचा व्यवहार तपासणे अद्याप बाकी - या प्रकरणातील आरोपींपैकी फक्त दोनच आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. बाकी सर्व आरोपींना जामीन मिळालेला आहे. न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी अब्दुल कादर शेख आणि चिनेदू इग्वे ज्यांच्याकडून व्यावसायिक प्रमाणात अवैध ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपी हे विदेशात देखील राहतात. त्यामुळे या सर्वांचा जबाब नोंदवण्यासाठी वेळ होत आहे. तसेच हे सर्व आरोपी एकमेकांच्या कनेक्शनमध्ये असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर देखील आले आहे. तसेच या प्रकरणातील पैशांचा व्यवहार तपासणे अद्याप बाकी आहे. या तपासात अनेक महत्त्वाचे जबाब नोंदवणे बाकी असल्याने न्यायालयाने आम्ही दाखल करण्यात आलेला अर्ज मान्य करावा, अशी NCB च्यावतीने न्यायालयात सांगितले आहे.

काय आहे प्रकरण? - 2 ऑक्टोबरला एनसीबीने मुंबईतील क्रुझवर सुरू असलेल्या पार्टीवर छापा मारला होता. यावेळी काही जणांकडे ड्रग्ज आढळल्याचा एनसीबीचा दावा होता. याच प्रकरणात त्यावेळी आर्यनसह 8 जणांना अटक करण्यात आली होती. पुढे तब्बल 27 दिवसानंतर आर्यन खानची 30 ऑक्टोबर रोजी आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली होती. उच्च न्यायालयाने आर्यन खानला अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला होता. त्यानुसार त्याला प्रत्येक शुक्रवारी मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागणार होती. आता न्यायालयाने ती अट शिथील केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.