मुंबई - बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची सोमवारी एनसीबीच्या टीमने ड्रग्ज प्रकरणात ६ तास चौकशी केली. या पूर्वी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने त्याला बुधवारी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, वैयक्तिक कारणे सांगून अभिनेता अर्जुन रामपालने तपास यंत्रणांकडून २१ डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती. आज रामपाल त्याच्यासोबत काही कागदपत्र घेऊन आला होता. रामपालच्या घरातून इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केल्याच्या वृत्तानंतर एनसीबीने त्याला दुसऱ्यांदा समन्स बजावले.
ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या सहा तासांच्या चौकशीनंतर संध्याकाळी एनसीबी कार्यालयातून बाहेर आला. अर्जुन सकाळी 10 ते 11 दरम्यान एनसीबी कार्यालयात पोहोचला होता. 21 डिसेंबरला अर्जुन रामपाल पुन्हा एनसीबीसमोर हजर झाला होता. त्याच्यावर ड्रग्ज प्रकरणात चौकशी केली गेली. या प्रकरणात एनसीबीने दिल्लीच्या डॉक्टरांचे स्टेटमेंट घेतले आहे. एनसीबीने न्यायालयात न्यायाधीशांना 164 अंतर्गत न्यायाधीशांकडेही डॉक्टरांचे निवेदन करून दिले आहे. डॉक्टरांच्या या विधानामुळे अर्जुनच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
या प्रकरणात, डॉक्टर म्हणाले - मॅटर अद्याप कोर्टा अधीन आहे, म्हणून मी आपल्याशी संबंधित तपशील देऊ शकत नाही. मात्र, ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी एनसीबीला सांगितल्या आहेत. माझे निवेदन दंडाधिकाऱ्यांसमोर दिले आहे. मी एनसीबीला साथ देईन. अर्जुन रामपाल यांच्या घरावर 9 नोव्हेंबरला छापा टाकण्यात आला होता. या छाप्यात त्याच्या घरातून ट्रामाडोलच्या गोळ्या जप्त केल्या. यानंतर अर्जुनचा लाइव्ह-इन पार्टनर गॅब्रिएला दिमित्रीएडसची दोनदा चौकशी केली गेली, तर अर्जुन 13 नोव्हेंबरला एनसीबीसमोर हजर झाला. एनसीबीने ड्रग्सच्या दोन प्रकरणांमध्ये गॅब्रिएलाचा भाऊ अॅगिसियालिस डेमेट्रिएडस यापूर्वीच अटक केली होती. अलीकडेच तो जामिनावर सुटला आहे.