मुंबई : आर्यन खान याला कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी ( Cordelia cruise drugs case ) एनसीबीकडून क्लीन चिट देण्यात आली ( NCB Clean Cheat To Aryan Khan ) आहे. कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीमार्फत मुंबई सत्र न्यायालयात आज दोषारोपपत्र सादर करण्यात ( Cruise Drug Case Charge sheet ) आले. ६ हजार पानांचे हे दोषारोपपत्र आहे. एकूण १० खंडांचे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. जे सध्या न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये आहे.
सहा हजार पानी आरोपपत्रात आरोपीवर दोषारोप ठेवण्यात आले आहे. या प्रकरणात विशेष एनसीबी एसआयटी करत आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस कोर्टाने एसआयटीला आरोपपत्र दाखल करण्यासाठी ६० दिवसांची मुद्दत वाढवून दिली होती. एनसीबी एसआयटीतर्फे ९० दिवसांची मुद्दत वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती. २ ऑकटोबर २०२१ रोजी एनसीबीने क्रूज ड्रग पार्टीवर धाड टाकत कारवाई केली होती. कार्डेलिया क्रूज ड्रग प्रकरणात एकूण 20 लोकांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती.
नेमकं प्रकरण काय? : मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी कार्डेलिया जहाजावर धाड टाकली होती. यावेळी जहाजावर रेव्ह पार्टी सुरु असल्याचे उघडकीस आलं होतं. या ठिकाणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आर्यन खान हा 27 दिवस जेलमध्ये रहाव लागलं होतं. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनचे व्हाट्सअॅप चॅट मिळवले होते. यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. यात अभिनेत्री अनन्या पांडे हिचंदेखील नाव आहे. आर्यन खान आणि अनन्या यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचं एनसीबी अधिकाऱ्यांच म्हणणं आहे. या दोघांतील व्हाट्सअॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टात सादर केला होता. त्यामुळे आर्यनला जामीन मिळण्यास अडचण झाली होती. मुंबई विशेष न्यायालयाने आर्यन खानचा जामीन फेटाळून लावला होता. मात्र त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानने जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर तीन दिवस सुरू असलेल्या युक्तिवादानंतर अखेर आर्यन खानला जामीन मंजूर झाला होता.
चौकशीतून समीर वानखेढेंना केले होते बाजूला - दोन ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूजवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. या छाप्याचे नेतृत्व एनसीबी मुंबईचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी केले होते. सदर क्रूजवर ड्रग पार्टी सुरू आहे, अशी माहिती एनसीबीला मिळाली होती. मात्र, कारवाईदरम्यान एनसीबी टीमने आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा या तिघांसोबत एकूण आठ जणांना ताब्यात घेतले होते. नंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात समीर वानखेडेंवर अनेक आरोप करण्यात आल्यानंतर त्यांना या चौकशीतून बाजूला करण्यात आले होते.
हेही वाचा : NCB's panch Died : आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू