मुंबई - आंतरराष्ट्रीय आणि कुरिअर आधारित अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी कंबर कसणाऱ्या एनसीबी मुंबई विभागीय युनिटने या सक्रिय असलेल्या सिंडिकेट्सचे पर्दाफाश करून परत मोठया प्रमाणात ड्रग्ज जप्त केले आहे. एनसीबीने तीन ठिकाणी कारवाई करून ५ कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे.
मेथाक्वॉलोन ड्रग्ज जप्त करण्यात - मुंबई येथील फॉरेन पोस्ट ऑफिसमधून कुरिअर पार्सलमधून 870 ग्रॅम हायड्रोपोनिक ड्रग्ज जप्त करण्यात आले. हे पार्सल अमेरिकेतून पाठवण्यात आले होते आणि नागपूर येथील रिसीव्हरला पाठवण्यात आले होते. त्यानंतर मुंबईतील डीएचएल एक्स्प्रेस कुरिअर पार्सलमधून 4.950 किलो मेथाक्वॉलोन ड्रग्ज जप्त करण्यात आले.
पटवण्यासाठी चौकशी केली - जे न्यूझीलंडला जाणार होते. हे पार्सल नागपूर येथून बुक केले होते. दोन्ही कुरिअर पार्सलसाठी नागपूरच्या एका ठिकाणाशी संबंधित असल्याने, दोन्ही प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी एक पथक तातडीने नागपूरला रवाना करण्यात आले. आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्या सिंडिकेटची ओळख पटवण्यासाठी चौकशी केली जात आहे.
अमली पदार्थांची तस्करी करणारी आंतरराज्य टोळी - कुरिअर प्रकरणांव्यतिरिक्त, एक्स्प्रेस वेजवळ कर्जत, रायगड जिल्ह्यात 7 ते 8 ऑगस्टदरम्यान मध्यरात्री एका आंतरराज्यीय अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे भांडाफोड करण्यात आले आहे. एका सक्रिय ड्रग सिंडिकेटद्वारे राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जच्या संभाव्य वाहतुकीबद्दल विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली होती. त्यानुसार वाहनांच्या हालचालीची माहिती प्राप्त झाली आणि एनसीबी पथकाला पाठवण्यात आले. दरम्यान, पथकाला वाहनाची ओळख पटली. वाहनाला घेराव घालून प्राथमिक चौकशी केली असता, चालकाला समाधानकारक उत्तर देता आले नाही. वाहनाची झडती घेतली असता, वाहनाच्या आत तयार केलेल्या गुप्त जागेतून जसे की दरवाज्याच्या आत आणि वाहनाच्या बॉनेटखाली असलेल्या जागेत लपवून ठेवलेले एकूण 88 किलो गांजा जप्त करण्यात आला.
दोघांना घेतले ताब्यात - संशयिताची घटनास्थळी चौकशी केल्यावर सुमारे ३-४ तासांच्या झाडाझडतीनंतर महामार्गाच्या बाजूला असलेल्या ढाब्यावरून आणखी दोन जणांना पकडण्यात यश आले. हे दोघे दुचाकीवर होते आणि त्यांना मुंबईतील वाहतूकदाराला गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवण्याचे आणि मार्गदर्शन करण्याचे काम देण्यात आले होते. आंध्रप्रदेशमधून आलेली ही खेप मुंबई आणि उपनगर भागातील स्थानिक पेडलर्सना वाटपासाठी आली होती.
आरोपींची चौकशी केली - अटक आरोपी अनुभवी तस्कर आहेत आणि 4 वर्षांहून अधिक काळापासून अवैध ड्रग्ज जाळ्यात सक्रिय आहेत. कन्साइनमेंट डिलिव्हरीचा कट आखत असताना आरोपींनी एनसीबीला चकवा देण्यासाठी वारंवार कॉन्टॅक्ट नंबर आणि गाडीची नंबर प्लेट बदलली. जेणेकरून एनसीबी ट्रॅकिंग करता येणार नाही. उर्वरित ड्रग्जचे जाळे पूर्णपणे नष्ट करण्यासाठी इतर पेडलर्स, सप्लायर लिंक्स आणि मुख्य सूत्रधार यांच्याबद्दल अधिक माहिती गोळा करण्यासाठी तीन आरोपींची चौकशी केली जात आहे.
हेही वाचा - SC Notice : शरद पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळेंना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस