ETV Bharat / city

Drug Case : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून साहिल शाहला अटक - NCB arrested Sahil Shah alias Flacko

एनसीबीने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणी साहिल शाह उर्फ ​​फ्लाको याला अटक केली आहे. गेल्या 9 महिन्यांपासून फरार असलेल्या साहिलचा एनसीबी अधिकारी शोध घेत होते. साहिलचे सुशांत सिंह राजपूत प्रकरणात पहिल्यांदा समोर आले होते.

NCB arrested Sahil Shah
साहिल शाहला अटक
author img

By

Published : Jan 28, 2022, 6:25 PM IST

मुंबई - एनसीबीने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणी साहिल शाह उर्फ ​​फ्लाको याला अटक केली आहे. गेल्या 9 महिन्यांपासून फरार असलेल्या साहिलचा एनसीबी अधिकारी शोध घेत होते. साहिलचे सुशांत सिंह राजपूत प्रकरणात पहिल्यांदा समोर आले होते. सुशांत सिंह राजपूतसह बॉलीवूडमधील अनेक प्रसिद्ध व्यक्तींना ड्रग्ज पेडलर्सच्या माध्यमातून तो ड्रग्जचा पुरवठा करत होता.

साहिल हा इंटरनॅशनल ड्रग्स सिंडिकेटचा मास्टरमाईंड होता, जो डी कंपनीशीही संबंधित होता. एनसीबीने अटक केलेल्या डी कंपनीच्या दानिश चिकना याच्याशीही तो संबंधित होता. आतापर्यंत पकडलेल्या सर्व ड्रग पेडलर्सनी एनसीबी चौकशीत सांगितले की, साहिल त्यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे जोडला जात असे. कोणीही त्याचा चेहरा पाहू शकत नव्हता कारण तो अंधारात आपला चेहरा झाकत असे. साहिलच्या अटकेमुळे एनसीबीला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचे अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.