ETV Bharat / city

Cruise Drug Case : एनसीबीकडून आणखी 4 जणांना अटक; अटक झालेल्यांचा आकडा 16 - ड्रग्ज पार्टी कारवाई

आर्यन खान यांच्यासह आठ जणांना अटक केली आहे. चौकशीनंतर आज (मंगळवारी) आणखी चार जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना ११ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आणखी चार जणांना एनसीबीने अटक केली आहे. यामध्ये समीर सैगल, आंदन गोपाळ, भास्कर यांच्यासह आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. यामुळे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या १६ झाली आहे.

ncb
ncb
author img

By

Published : Oct 5, 2021, 6:40 PM IST

Updated : Oct 5, 2021, 7:04 PM IST

मुंबई - कॉर्डीया द क्रूझवर हायप्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने कारवाई करत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान यांच्यासह आठ जणांना अटक केली आहे. चौकशीनंतर आज (मंगळवारी) आणखी चार जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना ११ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आणखी चार जणांना एनसीबीने अटक केली आहे. यामध्ये समीर सैगल, आंदन गोपाळ, भास्कर यांच्यासह आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. यामुळे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या १६ झाली आहे. याप्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करांचा समावेश असल्याचे समोर आल्याने एनसीबीने आता चौकशीची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी देशभरातील अधिकाऱ्यांना मुंबईत पाचारण करण्यात आले आहे.

आर्यन खानला अटक, एनसीबी कोठडी -

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कॉर्डिया द क्रूझवर हायप्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने शनिवारी रात्रीच्या सुमारास कारवाई करत १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी (मेफोड्रोन), २१ ग्रॅम चरस आणि २२ एक्स्टसीच्या गोळ्या आणि १.३३ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा या आठ जणांना ताब्यात घेतले आहे. यामधील आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा या तीन जणांना रविवारी न्यायालयात हजार केले असता त्यांना एका दिवसाची एनसीबी कोठडी देण्यात आली होती. सोमवारी पुन्हा या तीन जणांना तसेच इतर पाच जणांना अशा एकूण आठ जणांना न्यायालयात हजार केले असता ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली आहे. या आठ जणांची एनसीबीकडून कसून चौकशी केली जात आहे.

आणखी चार जणांना अटक -

एकीकडे एनसीबीकडून ताब्यात असलेल्या आरोपींची चौकशी केली जात असताना आणखी काही जणांची नावे समोर आली आहेत. त्यानुसार अब्दुल शेख, श्रेयस नायर, मनीष दर्या आणि अविन शाहू या चार जणांना एनसीबीने अटक केली आहे. या चौघांना जेजे रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा एनसीबी कार्यालयात आणण्यात आले आहे. त्यांची चौकशी सुरु असून त्यांना लवकरच कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती एनसीबीकडून देण्यात आली आहे. कार्डीया क्रूझ प्रकरणी याआधी आर्यन खान सह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. आता आणखी चार जणांना अटक करण्यात आल्याने अटक करण्यात आलेल्यांचा आकडा १२ वर गेला आहे.

पार्टीचा संपूर्ण तपशील एनसीबीने मागितला -

मिळालेल्या माहितीनुसार, कॉर्डिया द क्रूझवर संबंधित अधिकाऱ्यांकडून ज्या दिवशी धाड टाकली. त्या दिवशीचा जहाजाचा मेनिफेस्टो मागविला आहे. यातून जहाजावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा संपूर्ण तपशील, रूम नंबर, त्यांच्या आय-कार्डचा तपशील, मोबाइल क्रमांकासह इतरही माहिती उपलब्ध होईल. जहाजाचे सर्व सीसीटीव्ही फुटेजही जहाजाच्या अधिकाऱ्यांकडून मागविण्यात आले आहेत. याशिवाय या क्रूझवर ड्रग्ज डीलर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे कॉर्डींया द क्रूझवर २ ऑक्टोबर झालेल्या पार्टीचा संपूर्ण तपशील एनसीबीने मागितला आहे. याशिवाय क्रूझचे सीईओ जुर्गन बेलोम यांना पुन्हा समन्स बजावत चौकशीसाठी बोलावले आहे.

गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली येथून एनसीबी अधिकारी -

कॉर्डींया द क्रूझमधील पार्टीमध्ये ड्रग्स घेतल्याचे समोर आल्यावर एनसीबीने आतापर्यंत ११ जणांना ताब्यात घेतले आहे. क्रूझवर जे ड्रग्स आणण्यात आले होते. त्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करण्यात आला आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण आता आतंरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. त्यामुळे या प्रकरणात पार्टीचे आयोजक व त्यात सहभागी असलेले लोक संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान अनेक ठिकाणी धाडी घातल्या जाणार आहेत. त्याची तयारी एनसीबीने केली आहे. त्यासाठी मुंबईमधील एनसीबी अधिकाऱ्यांची संख्या कमी पडत आहे. एनसीबी अधिकाऱ्यांची संख्या कमी पडत असल्याने देशातील इतर एनसीबी कार्यालयातील अधिकारी मुंबईत बोलावण्यात आले आहेत. त्यानुसार गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली येथून एनसीबी अधिकारी मुंबईत आले आहेत.

हेही वाचा - Cruise Drug Case : आता एनसीबीच्या मदतीला अन्य राज्यातील अधिकारी

Last Updated : Oct 5, 2021, 7:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.