मुंबई - एनसीबीने काही दिवसांपूर्वी मुंबई आणि ठाणे परिसरात मोठी कारवाई करत, ड्रग्ज तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली होती. या कारवाईत पोलिसांनी २२० ग्रँम एमडी व ४३ किलो गांजासह २० लाखांची रोकड जप्त केली होती.
मुंबईत एनसीबीची कारवाई ड्रग्स आणि रोकड जप्त या प्रकरणातील आरोपी सरफराज पप्पी याच्या घरी काल एनसीबीने छापा टाकला असता. सरफराजच्या संपर्कात असलेला मोहम्मद इमरान लँबीच्या घरी ९.५० लाखाची रोकड आणि मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा मिळून आला आहे.सुरवातीला एनसीबी कारवाईसाठी आले असल्याचे कळाल्यानंतर इरफान लँबीच्या पत्नीने दरवाजा न उघडता. सर्व ड्रग्ज खिडकीतून फेकून पुरावे नष्ठ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एनसीबी अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे चार मजले रँपलिंग करून सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.
हेही वाचा - नाशिक येथील दुर्घटनेने महाराष्ट्र शोकमग्न, घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे