ETV Bharat / city

मुंबईत अंमली पदार्थ तस्करी विरोधात एनसीबीची धडक कारवाई; दोघांना अटक - मालाड एनसीबी कारवाई

लॉकडाऊन दरम्यान ऑनलाइन केक आणि पेस्ट्रीची ऑर्डर मोठ्या प्रमाणात वाढली होती. तसेच लॉकडाऊनच्या काळात बेकरी सुद्धा सुरू होती. त्याच दरम्यान बेकरीत केक आणि पेस्ट्रीत ड्रग्ज लपवून पुरवठा होत असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मालाड परिसरातील बेकरीवर छापा टाकला. घटनास्थळावरून एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी १६० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

अंमली पदार्थ तस्कर कारवाई
अंमली पदार्थ तस्कर कारवाई
author img

By

Published : Jun 13, 2021, 8:13 PM IST

Updated : Jun 13, 2021, 8:41 PM IST

मुंबई - मुंबईत ड्रग्ज तस्करांवर पोलिसांसह एनसीबीची करडी नजर असून कारवाईचा धडका कायम आहे. त्याच अनुषंगाने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मालाडमधील एका बेकरीतून ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याची माहिती मिळाली होती. लॉकडाऊन दरम्यान ऑनलाइन केक आणि पेस्ट्रीची ऑर्डर मोठ्या प्रमाणात वाढली होती. तसेच लॉकडाऊनच्या काळात बेकरी सुद्धा सुरू होती. त्याच दरम्यान बेकरीत केक आणि पेस्ट्रीत ड्रग्ज लपवून पुरवठा होत असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मालाड परिसरातील बेकरीवर छापा टाकला. घटनास्थळावरून एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी १६० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. केकमध्ये ड्रग्ज भरून हायप्रोफाइल परिसरात विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एनसीबीने एका महिलेसह आणखी दोघांना अटक केली आहे. या रॅकेटचा मास्टरमाईंड कोण आहे? हे अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी एनसीबीचा अधिक तपास सुरू आहे.

अंमली पदार्थ तस्करी विरोधात एनसीबीची धडक कारवाई

हेही वाचा -अज्ञातांकडून परळी वैजनाथ शहरातील वाहनांची नासधूस

Last Updated : Jun 13, 2021, 8:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.