मुंबई - अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक आज (बुधवार) सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी एक सूचक ट्विट केले आहे. एका शेरच्या माध्यमातून त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
"उनकी नींद खो गई है,
अब चैन खोने का वक्त आ गया है"
असे म्हणत, आज सकाळी १० वाजता भेटुया.. असे मलिकांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
![Nawab Malik's suggestive tweet](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-malik-7209727_10112021081448_1011f_1636512288_314.jpg)
मंगळवारी देवेंद्र फडणवीसांनी मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करत काही जमीन व्यवहाराची कागदपत्रे सादर केली होती. हे आरोप मलिकांनी तत्काळ फेटाळून लावले. मात्र या आरोपांवर उद्या सविस्तर उत्तर देणार असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा - Fadnavis Vs Malik : देवेंद्र फडणवीस-नवाब मलिकांमध्ये 'वाकयुद्ध'; पाहा कोण काय म्हणाले?
नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपप्रत्यारोपांत फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनीही उडी घेतली आहे. फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर अमृता फडणवीस यांनी 'बचाना है इन्हे अपना जमाई और काली कमाई' असे ट्विट करत मलिकांवर निशाणा साधला होता.
हेही वाचा - 'बचाना है इन्हे अपना जमाई और काली कमाई'; अमृता फडणवीसांचा मलिकांवर निशाणा