ETV Bharat / city

'यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede?; नवाब मलिकांचे पुन्हा एक टि्वट - समीर वानखेडे

आज महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पुन्हा एक टि्वट केले आहे. समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो नवाब मलिक यांनी ट्वीट केला. तसेच 'कबूल है, कबूल है, कबूल है...यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede ?' असा प्रश्न केला आहे. आता यावर वानखेडे हे काय म्हणतात हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.

Nawab Malik
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक
author img

By

Published : Nov 22, 2021, 9:20 AM IST

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) विरूद्ध समीर वानखेडे असा वाद चांगलाच पेटला असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यातच नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर (Sameer Wankhede) आरोप करण्याची एकही संधी सोडली नाही. शिवाय त्यांनी वेळोवेळी वानखेडे मुस्लिम असल्याचा दावा करत अनेक कागदपत्रे ट्विटरवर शेअर केल्याचं पाहायला मिळालं.

Nawab Malik
नवाब मलिकांचे टि्वट...
दरम्यान, नवाब मलिकांनी शेअर केलेल्या कागदपत्रांनंतर आता मध्यरात्री त्यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोने खळबळ उडाली आहे. नवाब मलिकांनी काल मध्यरात्री ट्विटरवर समीर वानखेडे यांचा फोटो टाकला आहे. त्या फोटोमध्ये समीर वानखेडे हे मुस्लिम वेशात स्पष्टपणे दिसून येत आहेत.समीर वानखेडेंचा मुस्लिम वेशातील फोटो शेअर करत नवाब मलिकांनी तसेच 'कबूल है, कबूल है, कबूल है...यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede ?' असा प्रश्न केला आहे. समीर वानखेडे व त्यांचे कुटूंबीय वारंवार आपण मुस्लिम नसल्याचा दावा करत आहेत. तसेच त्यांनी अनेकवेळा याबाबत खुलासाही केला आहे. पण नवाब मलिकांनी शेअर केलेल्या फोटोमुळे आता अनेक चर्चांना उधाण आलं आहे.अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी टाकलेल्या फोटोमुळे आता समीर वानखेडेंच्या अडचणी आणखी वाढणार असल्याचं दिसून येत आहे. तसेच या प्रकरणात आता पुढे आणखी काय होणार?, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.